आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त…
कविता
सागर
02322 - 225500, 09975873569
Kavita
Sagar Publication कविता सागर प्रकाशन
o
Registered with the International ISBN
Agency, London, UK and The Government
of India,
Ministry of Human Resource Development, New
Delhi
o
Title - Kavita Sagar Diwali Special (कविता सागर दीपावली
विशेषांक)
o
Editor - Anil Dhudat (अनिल धुदाट)
o
Year of Publication - November 01, 2013
o
Price - Rs. 250/- (मुल्य 250/- रुपये)
o
Language - Marathi / Hindi / English (भाषा - मराठी /
हिंदी / इंग्रजी)
o
Copyright © Kavita Sagar Publication (कविता सागर प्रकाशन)
All
rights reserved. No part of this publication may be reproduced, stored in a
retrieval system or transmitted, in any form or by any means, electronic,
mechanical, photocopying, recording or otherwise, without the prior permission
of the copyright holder. Only the publisher can export this edition from India. Due care
has taken to ensure that the information provided in this book is correct.
However, the publishers bear no responsibility for any damage resulting from
any inadvertent omission or inaccuracy in the book.
o
Published in India in 2013 by - Dr.
Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
Kavita Sagar Publication (कविता सागर प्रकाशन)
Jaysingpur - 416101,
Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 09975873569, kavitasagarpublication@rediffmail.com
o
Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center (धुदाट डी. टी. पी. सेंटर)
o
Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे)
o
Printed and Bound in India by - Shashikant
Kumbhojkar (शशिकांत कुंभोजकर)
Kumbhojkar Offset Printers,
Mahaveer Nagar, Sangli - 416416
o
Distributor - Raj
Dhudat (राज धुदाट)
Jaysingpur, Taluka - Shirol, District
- Kolhapur, Maharashtra, India
Contact:
02322 228891,
8485877232, rajdhudat@gmail.com

कवितासागर दिवाळी अंकाला पुरस्कार
ReplyDeleteसाप्ताहिक उल्हास प्रभात, ठाणे आणि आरोग्य होमिओपॅथीक फार्मसी यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक 2013 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी माणसाच्या दिवाळीचा जणू अविभाज्य भाग झालेल्या दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या "कवितासागर" दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले आहे.
ठाणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात "कवितासागर" नियतकालिकाचे उपसंपादक व कवी प्रकाश केसरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या ई टि व्ही वरील मालिकेची अभिनेत्री धनश्री काडगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या म्हणाल्या, वाचन संस्कृती लोप पावत आहे असे न म्हणता सर्वांनी वाचन संस्कृतीच्या वाढीस प्रयत्न करूया. मला देखील दिवाळी अंक वाचायला खूप आवडतात. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मधील महिमाची भूमिका करण्या अगोदर तिच्या आयुष्या संबंधित बरीच पुस्तके वाचावी लागली, तसेच सर्वांनी वाचनाकडे वळावे यासाठी मी प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे. वाचन संस्कृती लयाला जात चालली आहे, असे कितीही म्हटले तरी ते चुकीचे आहे. अन्यथा दरवर्षी दिवाळी अंकांची भर पडली नसती. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे मत साहित्यिक अनिल धुदाट (पाटील) यांनी व्यक्त केले.
नवसाक्षर व खेडोपाडयातील वाचन करणारे अनेक वाचक मला भेटतात. त्यामुळे वाचनसंस्कृती लयाला गेलेली नाही. दिवाळी अंकाने ते स्थान राखून ठेवले आहे, असे "कवितासागर" चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले
कवितासागर प्रकाशन गेल्या अनेक वर्षांपासून "कवितासागर"या दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्याच बरोबर या पूर्वीही सर्वोकृष्ट दिवाळी अंक म्हणून कवितासागरला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे येथील हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, “कवितासागर” दिवाळी अंकाच्या अतिथी संपादिका - सौ. विजया प्रकाश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर कार्यक्रमास उल्हास प्रभात संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ बनोटे, अभिनेत्री धनश्री काडगांवकर, कुळगाव - बदलापूर नगरपरिषेदेच्या नगराध्यक्षा - सौ. स्नेहा पातकर, उप नगराध्यक्ष - आशिष दामले इत्यादी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातून विविध भागातील दिवाळी अंकाचे संपादक - प्रकाशक - लेखक व कवी मोठया संख्येने हजर होते.
(फोटो: डावीकडून - कवितासागरचे उपसंपादक व कवी प्रकाश केसरकर यांनी अभिनेत्री धनश्री काडगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला मध्यभागी उल्हास प्रभात संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ बनोटे)
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली दिवाळी अंक स्पर्धा 2014.
ReplyDeleteदिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 25 प्रकारामध्ये 25 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणा-या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित होणा-या व्यक्तींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो. वेगळी वाट धरून साहित्यविश्वात वेगळी ठसा उमटवणा-या तसेच वेगळा प्रवाह निर्माण करणा-या दिवाळी अंकांना या बहुप्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले जाते. म्हणूनच साहित्य विश्वात या पुरस्काराचे वेगळेच स्थान आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील 25 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.
दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या 106 वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 1909 साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा.