Sunday, 8 December 2013

Book Review कविता सागर जानेवारी 2014 मध्ये जर काही साहित्यिक, संपादक किंवा प्रकाशक यांना आपल्या पुस्तकांचे परीक्षण प्रसिद्ध करावयाचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा, त्यांच्या साहित्याला आम्ही हजारो वाचकांपर्यंत पोहचवू. 02322 225500, 9975873569 kavitasagarpublicatio@rediffmail.com प्रेरणादायी विचार Encouraging Thoughts कविता सागर प्रकाशनाचे कार्यकारी संचालक आणि माझे मित्र डॉ. सुनील पाटील यांनी सौ. संजीवनी सुनील पाटील द्वारा संकलित 'प्रेरणादायी विचार' हा सुविचारांचा संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्या हाती देवून गेले. सर्व सुविचारांचे मी प्रथम वाचन केले. विविध विषयावरील सुविचारांचे संकलन करण्याचा अनोखा छंद या संग्रहाच्या रूपाने कळून आला. तो वाचता - वाचता हाती अमुल्य ठेवा गवसल्याची जाणीव झाली. कोणत्याही साहित्याचे वाचन करतांना त्यामध्ये मनाला भावणारी अनेक वाक्ये सापडतात; ती वाचल्यानंतर विसरता येत नाहीत. त्या वाक्यांचा मनावर सखोल परिणाम होतो. हि वाक्ये थोर संतांची असो अथवा साहित्यिकांची, पण त्यातील प्रेरणादायी विचार हे जीवनाला स्पर्शून जाणारे, मनाला बळकटी देणारे असतात. ह्या विचारांमध्ये जीवाला उन्नत बनवून त्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद असते. प्रेरणादायी विचार अंधारलेल्या मनाला प्रकाशाची दिशा दाखवण्याचे काम करतात. मानवी मनाला सुखाचे क्षण देणारे, दु:खातून जिद्दीने जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याची ताकद प्रेरणादायी विचारातून व्यक्त होते, हा विविध विषयावरील शेकडो विचारांचा संग्रह म्हणजे मौल्यवान ठेवाच आहे. संजीवनी पाटील यांनी संकलित केलेले विविध विषयावरील सुविचार अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचे असून त्याची मांडणीसुद्धा मराठी वर्णाक्षरानुसार केलेली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या संकटातून वाचवण्याचे व यशस्वी करण्याचे सामर्थ्य सुविचारात आहे. याची प्रचीती आम्हाला दैनंदिन व्यवहारातून येते. एक सुविचार वाचला तर पुढील सुविचार वाचावा अशी उत्कंठा वाढवणारे व लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच प्रेरणादायी विचार हे पुस्तक आवडेल याचा मला विश्वास आहे. प्रत्येक क्षण आपण कसा जगू शकतो आणि त्यातून कोणता अनुभव घेवू शकतो या बाबत वाचकांना मार्गदर्शन करणारे प्रेरणात्मक विचार संकलकाने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या आनंदासाठी संकलित केलेले आहेत. जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घेवून त्याला सुंदरता व सौंदर्यभावना वाढीस लावणारा हा संग्रह आहे. या संग्रहातील अनेक प्रेरणादायी विचार वाचकांच्या मनात रुजतील व त्यांना स्वतंत्रपणे विचार करावयास भाग पाडतील आणि त्यातूनच त्यांना आपल्या अंतर्मनाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळेल. सुविचार वाचनाबरोबर त्याचे चिंतन केले पाहिजे, त्यामुळे आचार विचारात बदल होतो आणि जीवनाची फुलणारी वाटसुद्धा त्यातून सापडू शकते असे मला वाटते. आपल्या प्रापंचिक जीवनातून वेळ काढून वेचक सुविचार संग्रहित करून ते पुस्तक रूपाने वाचकांच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल संजीवनी पाटील यांचे अभिनंदन ! भावी काळात आपल्या संग्रहातून, लेखनातून पुढील कार्य यशस्वीपणे घडावे यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा ! - नंदकुमार शंकरराव गायकवाड पुस्तकाचे नाव प्रेरणादायी विचार संकलक सौ. संजीवनी सुनील पाटील आवृत्ती प्रथम ISBN 978-81-926535-6-3 प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर पृष्ठे 60 (कव्हर सह) आकार 1/8 मुल्य 60/- विषय प्रेरणादायी विचारांचा संग्रह वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 - 225500, 9975873569, sunil77p@rediffmail.com पोटपाणी दुष्काळी वेदनेचा रोष - आक्रोश व्यक्त करणारा अनोखा कविता संग्रह ... एखाद्या सामाजिक समस्येने मानस त्रस्त होतात, आणि त्या समस्येच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवू लागतात. आज अशा अनेक समस्या समाजव्यवस्थेत काटेरी रूप धारण करू लागल्या आहेत. ग्रामीण समाज व्यवस्थेच्या कपाळी तर हा भोगवटा खिळयासारखा ठोकलेला दिसून येतो आहे. आणि त्या ठणकेने समाजमन ठणकू लागलेले आहे. सर्व गोष्टींच्या टंचाईचा फटका आधी खेड्यापाड्यांना बसतो. शहरे मात्र ह्याच सोयी सुविधा खेड्यातून, खेड्यातल्या माणसांकडून, जमिनीकडून, ओरबाडून - हिसकावून आणत आहेत. कारण व्यवस्थाच त्यांच्या भल्याची झालेली आहे. म्हणूनच खेड्यांच्या मातीत पिकणा-या हिरव्या भाजीपाल्यापासून तर डोंगरकड्यांच्या दगड - मुरमाचा ओघ शहराकडे जातो आहे. तेथील रस्ते पॉश, चकचकीत होताहेत आणि खेड्यात, रस्त्यात खड्डा आहे कि खड्ड्यात रस्ता आहे हे कळेनासे झाले आहे. अशा अवस्थेत सहाजिकच खेड्यातला माणूस अभावग्रस्त होवून कातावतो आहे. आक्रंदन करतो आहे. त्यातल्या त्यात तो माणूस जर संवेदनशील असेल तर हा आक्रोश शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. नव्या पिढीत खेड्यातून लिहिणारा असा जो कवी - लेखकांचा वर्ग आहे. तो या समस्यांना शब्दांच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यापैकी अनिलकुमार पाटील हे एक नाव आहे. शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला एक भान आले आहे. ते भान समाज विषयक जसे आहे, तसेच साहित्य विषयक सुद्धा आहे. समाज आणि साहित्य यातील परस्परसंबंधाचे आकलन या संवेदनशील पिढीला होत आहे. साहित्य हे सामाजिक समस्या मांडण्याचे मध्यम आहे. हे कळून आल्यामुळे आपणही साहित्यनिर्मिती करून या समस्यांना मुखर करावे अशी उर्मी तरुण पिढीच्या मनात येणे सहाजिकच आहे. ही उर्मी येण्याचे आणखी एक कारण असे की, गेल्या दशकात ग्रामीण भागातील साहित्यिकांनी जी साहित्यनिर्मिती केली आहे. कधी ती समस्या तात्कालिक स्वरुपाची होती. कधी प्रादेशिक स्वरुपाची तर कधी प्रादेशिकतेच्या खुणा ओलांडून पलीकडे जाणारी सर्वव्यापी होणारी होती. अशा समस्याप्रधान साहित्य निर्मितीच्या वाचनातून एक नवा वाचक वर्ग जसा निर्माण झाला तसाच लिहिणारा लेखकवर्ग सुद्धा निर्माण झाला. अर्थात साहित्य निर्मिती ही काही सहजसाध्य होणारी सोपी बाब नाही. त्यासाठी आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा, वाड:मयीन वारश्याचा जसा अभ्यास पाहिजे तशीच अखंड साधना सुद्धा महत्वाची आहे. निर्मितीमागे गांभीर्य सुद्धा महत्वाचे आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तर ही लिहिण्याची जबाबदारी अंगावर घेणे म्हणजे पौराणिक काळातील शिवधनुष्य पेलण्यासारखे झाले आहे. कारण आज फक्त आपल्याच वाड:मयीन परंपरांचे भान, साधना आणि सातत्य असून चालत नाही. तर फार मोठा अभ्यास, जागतिक स्तरावरच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक झाला आहे. त्यातूनच आपल्याला आपली मुळे सापडण्याची शक्यता आहे. असे असले तरी आज फार मोठ्या प्रमाणात काव्य निर्मिती होताना दिसते. त्यामागे सहज उपलब्ध होणारी प्रसिद्धी ही बाब जशी आहे. तशीच उत्कट उर्मी ही सुद्धा महत्वाची आहे. एखाद्या वाचनानंतर ह्या भावउर्मी मनात निर्माण होतात. आणि विविध आकृतिबंधाच्या माध्यमातून त्या शब्दरूप होतात. त्यामुळे लिहिले जाने हे जसे महत्त्वाचे आहे. तसेच छापले जाणे सुद्धा महत्त्वाचे आहे. कारण त्यातून मिळणारे भावनिक विरेचनाचे सुख सुद्धा मोठेच असते. आपण आपली वेदना मांडली असे समाधान एक प्रकारचे आत्मबल देत असते. त्यामुळे या निर्मितीला दाद देणे महत्त्वाचे ठरते. अनिलकुमार पाटील यांनी आपल्या परिसरातील वेदना भोगली, आणि काही भावतरंग त्यांच्या मनात आले. त्या भावतरंगाना त्यांनी शब्दबद्ध केले. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. सांगली जिल्ह्यातील ज्या परिसरात ते राहतात. त्या परीसारीतील पाणी प्रश्न केंद्रस्थानी ठेवून त्यांनी एका उत्कट उर्मीत ह्या कविता लिहिल्याचे दिसून येते. कृष्णा नदीच्या पात्रापासून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावरच्या तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जात, सांगोला या कायम दुष्काळी भागाला धो धो पडणा-या पावसाने आणि नेते म्हणवून घेणा-या माणसांनीही पाण्यापासून कायम वंचित ठेवले आहे. असे त्यांचे मत आहे. खरे म्हणजे प्रत्येक भाग ही वंचना भोगतो आहे. ती विविध प्रादेशिक स्वरुपाची आहे. पण यापाणी समस्येला कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करावे हा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे पाणी प्रश्नावर फार मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मितीही सातत्याने होताच आहे. पाण्याअभावी होणारी होरपळ हा जसा 'तहान' कादंबरीचा विषय आहे. तशीच कविवर्य ना. धो. महानोर यांची - 'पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी पाण्याविना दाहीदिशा आम्ही अनवाणी’ ही एकच कविता पाण्याच्या अभावाचे समग्र चित्रण करणारी कविता आहे. केवळ पाणीटंचाईचे वर्णन करूनच महानोर थांबले नाहीत, तर शेतीसाठी पाणी कसे तयार करावे हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे अनेक संशोधक, पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते या प्रश्नांचा आढावा घेत आहेत. त्यावर विविध अंगाने लेखन होत आहे. अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे आयोजन सुद्धा अनेक वेळा झाले आहे. हाच पाणीप्रश्न अनिलकुमार पाटील यांच्या सुद्धा आस्थेचा विषय आहे. म्हणूनच आपल्या विविध कवितांमधून ते या प्रश्नच विविध अंगाने आढावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या संग्रहातील 'राजपुत्राचे अपहरण' या कवितेतून सुर्य आणि चंद्र या प्रतिमा वापरून पाऊस म्हणजे आमचा राजपुत्र आहे. आणि त्याला सुर्य पळवून नेतो आहे. असा आरोप ते करतात पाऊस पडण्याच्या प्रक्रियेचा वैज्ञानिक दृष्टीकोन बाजूला ठेवला तरी यातील भावनात्मक बाजू त्यांच्या काळजाचा कंप व्यक्त करते. आणि विद्रोहाची भाषा सुद्धा बोलते. पाणी टंचाई; दुष्काळ या मुळे हे मन एवढं त्रस्त झालं आहे की ओरिसामध्ये महापूर आला त्यामुळे तेथील जनजीवन त्रस्त झालं हे कळूनही त्याचं तहानलेलं मन म्हणत - माझ्याही गावात महापूर आल्याची बातमी घेऊन एखाद वर्तमानपत्र यावं... अशी अपेक्षा करते. यातून त्यांच्या तप्त तहानेची दाहकता लक्षात यावी. तहानपूर्तीसाठी हे मन पावसामुळे होणारे महापुराचे नुकसान सोसायला सुद्धा तयार आहे. कारण पावसाअभावी गाव सोडून परांगदा होणारे गावकरी पाहण त्यांना आता असह्य झालं आहे. त्यांची 'गीत नवे' हि कविता म्हणजे तर या पावसाला 'प्रार्थना दयाघना' च्या रुपात केलेली नवी प्रार्थनाचं आहे. म्हणूनच ते समाजमनाला या प्रश्नावर पेटून उठण्याचे आवाहन करतात. हे आवाहन 'हल्लाबोल' च्या स्वरूपाचे - रखडलेल्या योजनांचा जाब कधी विचारणार आहे पात्यावर पाते घासल्याशिवाय का - 'धार' पात्यास चढणार आहे? अशा दाहक शब्दांचे हे हल्लाबोल आहे. म्हणूनच पाणी प्रश्न हा त्यांना आपल्या जखमेवरचा घाव वाटतो. हा कौरव कुटीलतेचा डाव लोकांनी मनापासून समजावून घेतला पाहिजे. असे झाले नाही तर; हा डाव उधळून लावला नाही तर आणखी एक गाव विस्थापित होणे अटल आहे. त्यामुळे येथील कारभारी सुद्धा आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यात हतबल ठरतो आहे. मी तुला जरीचं लुगडं घेऊ शकणार नाही कारण शेतारानातल्या पिकाला पाणी देणारं माझं फावड आता बंद झालं आहे. बाजारासाठी रोकडही देवू शकत नाही, कारण पाण्याची कावडचं बंद झाली आहे. या वैतागवाण्या परिस्थितीत जगण्यापेक्षा म्हणूनच घरधनी आपल्या कारभारणीला वैतागून म्हणतो - चल, जाऊ इथून जीण झालंया नागड केठेतरी लपवू - मन मातीच त्रांगड ... हे त्रांगड फक्त आभाळातून पडणा-या पावसाने निर्माण केलं नाही, तर त्याला कृष्णा खो-यातील पाणी वाटपाचा सुद्धा संदर्भ आहे. असे अनेक कवितांमधून कळून येते. खरिपामध्ये पावसाची एखादी बखाड पडली तर सरकारकडून कृत्रीम पाऊस पाडला जाईल, ते शक्य होईल. पण धरण आहे, पाट आहे आणि त्या पाटाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होत नसेल तर मात्र काय? त्यासंदर्भात काही तरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे. असा जो या कवीचा आक्रोश आहे. मागणं आहे. ते मागणं फक्त एका कवीचं, किंवा व्यक्तीचं राहत नाही, तर त्याला एका प्रदेशाचा संदर्भविस्तार प्राप्त होतो. कधी - कधी मग या संदर्भात आपणच का बोलावे; असा वैतागून सूरही कवी व्यक्त करतो. त्यातून - सगळ्यांनाच आनंद होतो, शिकार वाटून घेताना मग मीच का बार टाकून उडवावेत छरे? अशा विधानार्थी ओळी निर्माण होतात. कारण या वणव्यात त्यांना आपलं गणगोत सुद्धा होरपळताना दिसतंच असतं. जखमनामा, मोटच पाणी, पोटपाणी, अजून गप्प कां, शीळ, टाहो अशा सर्वच कविता 'पाणी' या विषयाला केंद्र करून त्यांनी लिहिल्या आहेत. या प्रश्नावर त्यांनी कधी गोफणगुंडांचा विद्रोही मार्ग सुचविला आहे. कधी टाहो फोडला आहे. तर कधी कधी काही व्यक्तींच्या व कुटुंबांच्या माध्यमातून या समस्येचे तपशील सुद्धा दिले आहेत. एकाच विषयाभोवती बहुतांशी कविता केंद्रित केल्यामुळे पुनरावृत्तीचा अटळ धोकाही त्यांना या संग्रहात पत्करावा लागला आहे, परंतु त्यांची संवेदना समजून घेण्यासारखी आहे. या विषयावर ना. घो. महानोराप्रमाणे खंडकाव्य लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असे दिसून येते. पाण्याभोवातीचे भावतरंग हा बहुतांशी कवितांचा विषय असला तरी इतर विषयावर सुद्धा ते चांगल्या प्रकारे कविता लिहू शकतात. त्या खुणाही संग्रहातील इतर कवितांमध्ये दिसून येतात. 'शिवराम खरारे' हे व्यक्तीचित्र सुद्धा लक्षवेधी झाले आहे. व्यक्तींना केंद्र करून कविता करण्याचे कसब इंद्रजीत भालेराव यांनी साध्या केले आहे. तसा प्रयत्न काही कवितामधून दिसून येतो. 'सांजसंकेत' ही कविता सुद्धा प्रभावी आहे. एक चांगल्या कवितेची बीजे या कवितेत आहेत. आशयदृष्ट्या प्रामाणिक असलेली अशी ही कविता आहे. 'सांजसंकेत' ही कविता प्रादेशिक बोलीभाषेशी प्रामाणिक राहून लिहिल्यामुळे अधिक सरस ठरली आहे. या संवादी कवितेतून कुटुंबस्वस्थाकडे निर्देश केला असून स्त्रीच्या मनातील एक सुप्त भय साकार करण्यात यशस्वी ठरला आहे. 'तसं, तू म्हणू नगस त्यो कुठबी जात नसलं बापयाची जात हाय येता जाता कुठबी फसल... या लोक भाषेतील लयीत 'स्त्री' च्या मनाचा घेतलेला वेध वास्तवदर्शी, तेवढाच भावूक व काव्यमय झाला आहे. या वाटेने त्यांची वाटचाल सुरु राहिली तर समाजमनातील असे अनेक 'काव्यमोती' त्यांना गवसू शकतील. अशी आशा बाळगायला हरकत नाही. - सदानंद देशमुख पुस्तक पोटपाणी कवी अनिलकुमार पाटील प्रकाशक सौ. रेखा पाटील प्रकाशन अभिरुची प्रकाशन, जयसिंगपूर पृष्ठे 100 (कव्हर सह) आकार 1/8 मुल्य 60/- विषय दुष्काळी वेदनेचा रोष - आक्रोश व्यक्त करणा-या कविता वर्गवारी कविता संग्रह संपर्क 02322 - 222144, 9420011417 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविण्यासाठी एक उत्तम पुस्तक क्रियापदांचा खजिना संगणकाचा कितीही प्रसार झाला आणि इंटरनेटच्या माध्यमातून कितीही माहिती उपलब्ध झाली; तरी ग्रंथांचे महत्व आणि अस्तित्व कायम याहते, या जगभर आलेल्या अनुभवाच्या आधारे “कविता सागर” प्रकाशन, जयसिंगपूरने इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी एक उत्तम पुस्तक "क्रियापदांचा खजिना" या नावाने इंग्रजी - मराठी शब्दकोश प्रसिद्ध केला आहे. अवघ्या पन्नास रुपयात तो सर्वत्र उपलब्ध आहे. इंग्रजी शब्दांचा अर्थबोध झाला नाही, तर शब्दकोश पाहण्याची सवय अनेकांना होती; पण आता नव्या जगात शब्दकोशाचे वाचन करून विविध शब्दांच्या अर्थछटा समजावून घेवून आपली भाषा समृद्ध करण्याकडे कल वाढला आहे. या शब्दकोशाचे संपादन प्रसिद्ध इंग्रजी शिक्षक राज धुदाट यांनी अथक प्रयत्न पूर्वक केले, त्यांच्या योगदानातून 'क्रियापदांचा खजिना' हा शब्दसंग्रह आकाराला आला. या साठी देखणा टाइप आणि उत्तम दर्जाचा कागद वापरला आहे. राज धुदाट यांच्या अथक प्रयत्नानंतर सिद्ध झालेल्या या शब्दकोशानंतर ते आणखीही शब्दकोशाचे काम "कविता सागर" प्रकाशनासाठी करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण द्यावे कि नाही, यावर खरे तर आपल्या देशाचे राष्ट्रीय धोरण असायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ यावर मतप्रदर्शन करणार आहे, ही उत्तम बाब आहे; पण ते करण्यापूर्वी या प्रश्नाचा सर्व बाजूंनी अभ्यास, संशोधन करणारे रिसर्च संशोधक नेमून त्यांचा विचार घेणेही आवश्यक ठरेल. मातृभाषेत शिक्षण घेतले की मुलांचा ते ज्ञान आत्मसात करण्याकडे कल अधिक असतो, असे सांगणारी मंडळी आहेत, पण मुले लहान वयात एका वेळी अनेक भाषा सहजपणे शिकू शकतात आणि उलट ती जितक्या अधिक भाषा आत्मसात करतील तितक्या त्यांच्या भाषिक विकासाच्या दृष्टीने ते चांगले आहे. त्यामुळे घरी मातृभाषा आणि इंग्रजी ज्ञानभाषा, हे सूत्र किमान काळाची गरज ओळखून तरी आपण अंगीकारायला हवे. आपल्या भाषिक राज्यपद्धतीत त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेला महत्व आहे; पण जातीक घडामोडींचा विचार होतो, तेंव्हा प्रादेशिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय धोरणालाच अधिक महत्व असते. साधा विचार केला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठा झाल्यावर नोकरी-व्यवसायानिमित्त दुस-या राज्यात किंवा देशात गेला तर तो कोणत्या भाषेत व्यवहार करणार आहे? आपल्या देशातील विद्यापीठामध्ये, आयआयटी, आयआयएम्स मधली ज्ञानभाषा कोणती आहे? dkghapk baxzth’kh 36 pk vkdMk vlrks R;keqaGs rs Lor%yk baxzthiklwu pkj gkr nwj jkg.ks ilar djrkr- R;akuh pqdhpk let d:u ?ksryk vkgs dh] baxzthr laHkk"k.k dj.ks R;kaP;klkBh v’kD; vkgs- i.k eh rqEgkyk lkaxrks v’kD; e/;sp ’kD; nMysys vkgs gs R;kaP;k y{kkr ;sr ukgh vkf.k gks ßiz;Rukarh ijes’ojÞ gs rs foljysp vkgsr- Treasure of Verbs fØ;kinkapk [kftuk gs iqLrd rqeP;k gkrh nsrkauk vkEgkyk vkuan gksr vkgs- ejkBh ek/;ekP;k fo/;kF;kZaph baxzth 'kCnlaxzgkph xjt y{kkr ?ksowu ;k iqLrdkph jpuk dj.;kr vkyh vkgs- fØ;kinkaph :is ekghr ulY;kus fo/;kF;kZauk xks"V Ikq.kZ djk]i= fygk] fuca/k fygk ba- iz'u vo?kM tkrkr R;keqGs R;kauk baxzth fo"k;kr deh ekdZl iMrkr o R;kpk ifj.kke R;kaP;k ,dw.k VDdsokjhoj gksrks- rlsp baxzth laHkk"k.k djrkauk lq/nk ;ksX; fBdk.kh ;ksX; fØ;kin u okijY;kus gks.kkÚ;k pqdkaeqGs R;kapk vkRefo'okl [kkykorks- fo|kF;kZaapk 'kCnlaxzg okkys vkgsr vkf.k R;keqaGsp gYYkh tkxkstkxh baXyh’k fLidhax Dyklsl igk;yk feGrkr f’kok; baxzth f’kdo.kkjh vusd iqLrds] dWLksVl ] osclkbZVl miYkC/k vkgsr- baxzthyk txkph Hkk"kk ek.kys tkrs- baxzth f’kok; dfjvjp ikugh gkyr ukgh vls EgVY;kl okoxs Bj.kkj ukgh- baxzth ;sr ulY;kus foKku ’kk[ksyk tk.;kph bPNk iw.kZ u >kY;kus nq[kh >kyys fo|kFkhZ o pkaxY;k ixkkjkph uksdjh u feGky;kus grk’k >kkysys r:.k vkiY;kyk tkxkstkxh HksVrkr- baxzth gh fo’olaoknkph Hkk"kk d’kh f’kdrk ;sbZy\ ;k iz’ukph vusd mRrjs vkgsr- tls dh baxzth orZekui=] ekfld fdaok iqLrd okp.ks- baxzth ckrE;k ,sd.ks] O;kdj.kkps fu;e ikB dj.ks] baxzths ;ssrs R;kP;k’kh eS=h dj.ks] bafXy’k fLifdapk Dykl tkWbZu dj.ks bR;kanh- ijarw ;k lokZ is{kk egRokph xks"V Eg.kts baxzth f’kd.;kph ftÌ goh vkgs- dkj.k cÚ;kp osGk vki.k fu.kZu ?ksrks dh vkt iklwu baxzth ckrE;k ,sdk;P;k] njjkst fMD’kujhrwu ngk & fol ’kCn ikB djk;ps] fe=k’kh baxzthrwup cksyk;ps- dkgh fnol fu.kZ; ?ksrY;kizek.ks vki.k okxrksgh i.k dkgh dkj.kkeqGs gs fu.kZ; tkLr fnol fVdr ukghr o vki.k eqG fBdk.kh ijr ;srks- vesfjdsr ,dk xjhc ?kjkr tUeysyh foYek :MkWYQ ftÌhp ,d vnHkqr mnkgj.k vkgs- ygk.ki.kh foYekyk iksfyvks >kyk- MkWDVjkus lkafxrys dh] rh d/khp pkyw ’kd.kkj ukgh- i.k frP;k vkbZus fnysY;k izksRlkgkus frus txkkrhy lokZr osxoku L=h gks.;kps LoIu ikghys- o;kP;k uoO;k o"khZ MkWDVjkapk lYYkk u tqekurk frus pkyk;yk Lkq:okr dsyh- o;kP;k rsjkO;k o"khZ /kko.;kP;k ’k;Zrhr mrjyh o rh lokZr ’ksoVh vkyh अशाप्रकारे frus vusd ’k;Zrhr Hkkx ?ksryk o rh lokZr ’ksoVh ;sr jkghyh- foYek frP;k ftÌh eqGs ,ds fno’kh vkWfyEihdyk ;sÅu iksgpyh- rsFks frph Li/kkZ d/khgh u gkjysY;k T;qVk gsbuh ukokP;k L=h’kh >kyh- 100 ehVj] 200 ehVj o 400 ehVj ¼xV’kZr½ /kko.;kP;k ;k frUgh ’k;Zrhr frus T;qVkyk gkjoys fryk fru lqo.kZ inds feGkyhr vkf.k gk bfrgkl cuyk% dh ,d fodykax L=h 1960 P;k vkWfYkfEide/;s txkkrhy lokZr osxoku L=h cuyh- ;k lR; ?kVuse/kwu vki.k f’kdrks dh] ftÌ vlsy rj vki.k dkghgh d: ’kdrks- iksfyvks >kysyh foYek /kko.;kP;k Li/ksZr ighyh ;sÅ ’kdrs rj vkiY;kyk pkaxys cksyrk ;sr vlwu vki.k baxzth dk cksyw ’k.kkj ukgh ! भाषेमुळे आपल्या मनातले विचार, भाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्‍या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. परंतू मातृभाषा सोडून आणखीन एक दोन भाषा जर येत असतील तर त्याचा देखील आपल्याला फायदा होतो हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात 'Knowledge is not burden' ज्ञान हे ओझ नाही. इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढवतच जात आहे. संपर्क - माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते. जगात सुरु असलेल्या स्पर्धेचा विचार करून जगाची ज्ञानभाषा म्हणून आम्हाला इंग्रजीचा स्वीकार करावा लागेल. एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला शब्दसाठा वाढविल्यास शिवाय ती भाषा आपण शिकूच शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याची सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही . पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास. आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल. क्रियापदांचा खजिना या पुस्तकाची इंटरनेट आवृत्ती सुद्धा प्रसिद्ध झाली असून या आवृत्तीला खूप मोठ्या प्रमाणावर वाचकांनी पसंती दर्शवली आहे. - अनिल धुदाट (पाटील) पुस्तक क्रियापदांचाखजिना लेखक राज धुदाट प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कविता सागर प्रकाशन पृष्ठे 44 (कव्हर सह) आकार A 4 मुल्य 50/- विषय इंग्रजी शब्दकोश वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 225500, 9975873569 sunildadapatil@gmail.com शालेय मुलांसाठी एक सर्वोत्तम निबंध संग्रह संवाद निबंध हा आधुनिक गद्यलेखनाचा एक प्रकार असून, 'निबंध' या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांपैकी 'एकत्र बांधणे' किंवा 'रचणे' हे अर्थ या लेखन प्रकाराशी अधिक जुळते मिळते आहेत. एकेकाळी भूर्जपत्रांवर लेखन केले जाई व अशी भूर्जपत्रे एकत्र करून बांधत. एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध, असे म्हणता येईल. अगदी छोटे गद्यलेखन टीपा, टिप्पणी किंवा टिपण म्हणता येईल. अगदी मोठे लेखन व्याप्ती लेख, प्रबंध वा ग्रंथही म्हणता येईल. व्याप्तीदृष्ट्या या दोहोंच्या मध्ये कुठेतरी निबंध हा प्रकार बसू शकेल. एखाद्या विषया संबंधी प्रतिपाद्या समाधानकारकपणे कसे मांडता येईल, यावर लेखनाची व्याप्ती अवलंबून असते. त्यामुळे टिपा -टिपाणे आणि प्रबंध - ग्रंथ या दोहोंमध्ये कुठेतरी बसणाऱ्या निबंध लेखनातही ठराविक व्याप्ती आढळत नाही. काही निबंध लहान, तर काही दीर्घ असू शकतात. लेखना मागील उद्दिष्टही त्याची व्याप्ती तसेच ठेवण या घटकांवर परिणाम करतेच. टीपा-टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ यांसारख्या प्रत्येक लेखन प्रकाराचा घाट लेखन विषयक भूमिकेवर अवलंबून असतो. संस्कृतमध्ये गद्यपद्यात्मक ग्रंथरचनेला सामान्यपणे प्रबंध असे म्हटले जाते. पुढे आख्यानात्मक अथवा कथात्मक काव्याला प्रबंधकाव्य म्हटले जाऊ लागले. आधुनिक परिभाषेत सामान्यपणे पीएच्. डी. साठी केलेल्या संशोधनात्मक लेखनास प्रबंध म्हटले जाते. संस्कृतात निबंध ही संज्ञा असली तरी, आधुनिक अर्थाने जी निबंधरचना अभिप्रेत आहे ती संस्कृतात नाही. पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखनप्रकार सोळाव्या शतकाच्या शेवटीशेवटी उदयास आला. त्याचा जनक माँतेन (१५३३-९२) हा फ्रेंच लेखक मानला जातो. इंग्लिशमध्ये 'एस्से' अशी संज्ञा आहे व ती फ्रेंच संज्ञेवरून आलेली आहे. एस्से या संज्ञेचा शब्दश: अर्थ 'प्रयत्न करणे' असा आहे. इंग्रजीमध्ये निबंधवजा गद्यलेखनाला 'काँपोझिशन', 'आर्टिकल' अशाही संज्ञा आढळतात. पूर्वी 'डिस्‌कोर्स' असाही शब्द वापरत. इंग्रजीतील 'ट्रीटिज' संज्ञेला मराठीत प्रबंध म्हटल्याचे दिसते व तिची व्याप्ती निबंधाहून मोठी असते. इंग्रजीतील 'मोनोग्राफ' या प्रकारातील लेखनही एखाद्या विषयावरील संक्षिप्त पण सर्वांगीन माहिती देणारे असते. मराठीत त्याला व्यक्तिलेख असे सामान्यपणे म्हटले जाते. इंग्रजीत 'रिसर्च पेपर' (शोध - निबंध किंवा शोध - लेख) हाही गद्यलेखनाचा प्रकार असून तो संशोधनविषयक प्रतिपादनास लावण्यात येतो. माँतेनप्रणीत निबंधात लेखकाच्या आत्माविष्काराला किंवा आत्मनिष्ठेला प्रधान्य होते. तथापि बेकन सारख्या लेखकांनी इंग्रजीत जो निबंधप्रकार रूढ केला, तो अधिक वस्तुनिष्ठ, विश्र्लेषणात्मक आणि तर्कशुद्ध मांडणीचा होता. सामान्यपणे आपण ज्याला निबंध म्हणतो, त्यात एखाद्या विषयाचे वस्तुनिष्ठ दृष्टीने केलेले विवेचन महत्त्वाचे असते. आत्मनिष्ठ निबंध हा माँतेनने स्वत:च म्हटल्याप्रमाणे, लेखकाच्या आत्मचित्रणा सारखा असतो. माँतेनच्या या आत्मनिष्ठेच्या बीजाचाच विकास पुढे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लघुनिबंध, ललित निबंध, काव्यात्म निबंध किंवा गद्य काव्य यांच्या स्वरूपात झाला. इंग्रजीत या प्रकारास 'पर्सनल एस्से' म्हणतात. पश्चिमी साहित्यात आत्मनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा या दोहोंचे प्रभाव निबंधलेखनावर सारख्याच प्रमाणात राहिल्याचे दिसून येते. अब्राहम काउली, बेकन, मेकॉले, कार्लईल, जी. के. चेस्टरटन, सॅम्युएल जॉन्सन, स्टील, अँडिसन, चार्ल्स लँब, ए. जी. गार्डनर अशी इंग्रजी साहित्यातील निबंधकारांची परंपरा पाहिली, तरी तीत हे दोन्हीही प्रकार प्रभावी राहिल्याचे आणि पुष्कळदा एकमेकांत मिसळून गेल्याचे दिसून येते. निबंध म्हणजे 'तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना’. तथापि, ही व्याख्या निबंध, प्रबंध, ग्रंथ या सर्वच प्रकारांचा अंतर्भाव करणारी आह. वरील लक्षणांनी युक्त अशी २०/२५ पृष्ठांपर्यंतची रचना म्हणजे निबंध, त्याहून मोठी रचना (३००-४०० पृष्ठांपर्यंतची) म्हणजे ग्रंथ व या दोहोंच्या मध्ये बसणारा प्रकार म्हणजे प्रबंध होय. वरील व्याख्येनुसार विचार प्रतिपादन किंवा विचार प्रर्वतन करणे हा निबंध लेखणाचा हेतू असतो, असे दिसेल. व्यापक अर्थाने या हेतूच्या पूर्ततेसाठी एखादा विषय घेऊन त्या विषयाची अंगोपांगे आणि अर्थपूर्णता विशद करण्याचा प्रयत्न निबंधकार करतो. निबंधाला अर्थातच अविषय असा कोणताच नाही. अगदी तात्कालिक किंवा प्रासंगिक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी वृत्तपत्रातून येणारे संपादकीय लेख किंवा इतर लेख यांनाही निबंध म्हणता येतील. साहित्य समीक्षात्मक लेखही निबंध म्हणता येतील. राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, तात्विक, वैज्ञानिक विषयांवरील एका विशिष्ट मर्यादेत विवेचन करणारे लेखही निबंध म्हणता येतील. वैचारिक पातळीवर असा काही विषयांचा परामर्श घेतला जातो, त्याच प्रमाणे व्यक्ति विषयक शब्दचरित्रेही निबंध म्हणता येतील. विनोदी लेख हेही एका दृष्टीने विनोदी निबंधच ठरतात. तेव्हा निबंध प्रकारात विषयाला कसल्याच मर्यादा नसतात; कोणत्याही विषयाची तर्कसंगत, सप्रमाण, वस्तुनिष्ठ अशी मध्यम स्वरूपात केलेली मांडणी निबंधात महत्त्वाची असते. अशी मांडणी अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकते. उदा., निबंधाचा मथळा, त्याचा प्रारंभ, त्यातील मुद्दे, उदाहरणे वा दाखले, आलंकारिकता, खंडनमंडनाची वा युक्तिवादाची पद्धत, विनोद स्थळे इत्यादी. निबंध शीर्षके आकर्षक व अर्थपूर्ण असावीत. उपोद्‌घात-उपसंहारवजा मजकुरांनी निबंधातील विवेचनाचा अनुक्रमे परिचय व सारांश देण्याचा प्रयत्नही काही निबंधात आढळतो. दीर्घ निबंधात उपसंहाराची वा सारांशनिवेदनाची जोड दिल्यास वाचकाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. निबंधाला खरा घाट त्यातील मुद्देसुद मांडणीमुळेच लाभतो. एखाद्या विषयाच्या अंगोपांगांची क्रमाक्रमाने उकल करीत जाणारा व लेखनाचे प्रतिपाद्य परिणामकारकपणे मनावर ठसविणारा निबंध स्वत:चा एक स्वयंभू घाट धारण करीत असतो. तथापि केवळ विषयाच्या अंगोपांगांची संयुक्तिक उकल करून हा घाटप्राप्त होईलच असे नाही; तर त्याला ओघवते प्रतिपादन, त्यातीलसुबोधता व सुस्पष्टता, मार्मिक दृष्टांतादी अलंकार, चपखल युक्तिवाद, नर्म विनोद स्थळे, वेधक भाषाशैली, विचाराचा नवीन्य व एकूण अभिव्यक्तीचे स्वारस्य इत्यादींनी डौल प्राप्त होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून निबंधाला विचार सौंदर्याचा घाट प्राप्त होतो. निबंध साहित्यात निबंधकाराच्या व्यक्तिमत्त्वालाही अर्थातच महत्त्व असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याने निवडलेले विषय, त्यांची केलेली मांडणी आणि त्याची भाषाशैली यांवर उमटलेला असतो. याचा अर्थ निबंध हा प्रकृतीने वस्तुनिष्ठ लेखनप्रकार असला, तरी त्यात लेखकाच्या आत्मनिष्ठेचे दर्शन सूचकपणे घडतेच. शैलीसारख्या किंबहुना निबंधातून सूचित झालेल्या मतांसारख्या गोष्टींवरून हे दर्शन घडते. कोणतेही लेखन हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ असणे अशक्य आहे. अगदी ऐतिहासिक वा वैज्ञानिक विषयांवरील लेखनही, अल्प प्रमाणात का होईना, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक ठरते. आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे महाभारतातील राजधर्मासारखे शांतिपर्व प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल. रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे उदाहरणार्थ राजधर्म, सेवकधर्म यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल. इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने 'अँन एस्से ऑन क्रिटिझम' व 'अँन एस्से ऑन मॅन' या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचार प्रर्वतनालाच महत्त्व आहे. तेव्हा गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्य प्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधा संबंधीचाच आहे. निबंध लेखन कठीण व दुर्लभ साहित्य प्रकार आहे. निबंध लेखनासाठी लेखकाला इतिहासाचे ज्ञान, पौराणिक कथा व सद्य परिस्थितीची जाणीव व ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. निबंध साहित्याचा उदय पश्चिमेकडे सोळाव्या शतकाच्या अखेरीस झाला. आधुनिक भारतीय भाषांत इंग्रजी भाषा साहित्याच्या परिचयाने एकोणिसाव्या शतकात हा प्रकार रूजला. ज्या परिस्थितीत निबंधप्रकार उदयास आला, तिचा विचार करून काही विचारवंतांनी निबंध साहित्या मागील जीवनविषयक प्रवृत्ति-प्रेरणांचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्या ऐवजी बुद्धीवादाने, तर्कशुद्ध रीतीने, शास्त्रीय पद्धतीने व लौकिक भूमिकेने त्या विषयाचा मागोवा घेणे ही आधुनिक दृष्टी निबंध साहित्या मध्ये असते, असे म्हटले जाते. शब्द प्रामाण्या ऐवजी बुद्धिप्रामाण्य, समाजा बरोबर व्यक्तीचे मूल्य; पारमार्थिक निष्ठेऐवजी इहलोकनिष्ठा यांचा पुरस्कार करण्याची प्रवृत्ती निबंध साहित्याच्या मुळाशी आहे, असे म्हटले जाते. याचे प्रत्यंतर आधुनिक भारतीय भाषांतील निबंध साहित्या वरून येऊ शकते. प्रबोधनाचे सगळे प्रश्नोपप्रश्न भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळलेले आहेत. त्यामागे एक आधुनिक दृष्टीकोन आहे. आधुनिक निबंध साहित्य पाहिले, की त्यामागील इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचे अधिष्ठान लक्षात येते. निबंध वाङमयाला उतरती कळा लागली आहे, असा एक आक्षेप घेतला जातो. निबंध याऐवजी लेख, निबंध संग्रहा ऐवजी लेखसंग्रह अशा संज्ञा रूढ होत चालल्या आहेत. स्वत:ला निबंधकार म्हणवून घेण्यापेक्षा, समीक्षक, विचारवंत किंवा विचारवंत लेखक म्हणवून घेणे अधिक पसंत करण्यात येत आहे. तथापि, संज्ञेचा आग्रह सोडला तर, निबंधाची जी बुद्धीवादी, सप्रमाण, तर्कसंगत विवेचन करण्याची प्रकृती आहे, ती लेख किंवा लेखसंग्रह यांत टिकून असल्याचे दिसून येईल. समाजाला वैचारिक पातळीवर नाना विषयांची सप्रमाण माहिती आणि दृष्टी पुरवणारा निबंध हा प्रकार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. शालेय जीवनात निबंधलेखन आणि वक्तृत्वाचा सराव झाल्यास त्यानंतरच्या स्पर्धात्मक जीवनव्यवसायांतही त्याचा उपयोग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन नामवंत वक्तृत्व स्पर्धां मधील आणि निबंध स्पर्धां मधील उत्कृष्ट ठरलेल्या डॉ. कुमार पाटील द्वारा लिखित विद्यार्थ्यांच्या निबंधांचा उत्कृष्ट संग्रह प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी कविता सागर प्रकाशना मार्फत प्रकाशित केला आहे. निबंध संग्रह दोन भागांत असून निबंध संग्रहाचा पहिला भाग 'संवाद' या नावाने वाचकांच्या हातात पोहचला असून त्यामध्ये विविध विषयावर १९ निबंध आहेत, संवाद पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, निबंध संग्रहाचा दुसरा भाग 'सुसंवाद' या नावाने लवकरच बच्चे कंपनीच्या सेवेत येत आहे. विविध स्तरांवर आयोजित होणा-या वक्तृत्व व निबंध स्पर्धां मध्ये विषयांचेही वैविध्य असते. हे निबंध व भाषणे प्रत्यक्ष तेथे जाणा-यानाचं अनुभवता येतात. डॉ. कुमार पाटील यांच्या संवादने ती निबंध व भाषणे सर्वांसाठी उपलब्ध करून आणखी एक उद्देश साध्य केला आहे. संवाद हे त्याच्या साहित्यिक दर्जामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य वाचकांसाठीही संग्रहणीय असे ठरले आहे. - अनिल धुदाट (पाटील) पुस्तक संवाद लेखक डॉ. कुमार पाटील आवृत्ती प्रथम ISBN 978-81-926535-2-5 प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर पृष्ठे 68 (कव्हर सह) आकार 1/8 मुल्य 60/- विषय निबंध संग्रह वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 - 225500, 9975873569 Treasure of Opposite Words विरुद्धार्थी शब्दांचा खजिना भाषेमुळे आपल्या मनातले विचार, भाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्‍या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. परंतु मातृभाषा सोडून आणखी एक दोन भाषा जर येत असतील तर त्याचा देखील आपल्याला फायदा होतो, हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात ''Knowledge is not burden'' ज्ञान हे ओझं नाही. इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढतच जात आहे. संपर्क-माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते. एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला शब्दसाठा वाढविल्याशिवाय ती भाषा आपण शिकूच शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याची सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही. पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल. प्रत्येक शब्दाचे होणारे अचूक उच्चार व त्याचे होणारे सर्वं मराठी अर्थ देण्यात आले आहेत. पुस्तकाची मांडणी अत्यंत सोपी व सुबक केली आहे. त्यामुळे शब्द शोधण्यासाठी अडचण येत नाही. या पुस्तकात सरावासाठी स्वाध्यायाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इंग्रजी भाषेचे तीस अदभूत सत्य विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालतील यात तिळमात्र शंका नाही. विद्यार्थी , पालक व इंग्रजी भाषा शिकणार्‍या सर्वांसाठी हे पुस्तक महत्वाची भुमिका पार पाडेल असा आम्हाला विश्वास वाटतो . पुस्तक विरुद्धार्थी शब्दांचा खजिना लेखक सौ. रोझमेरी राज धुदाट प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कविता सागर प्रकाशन पृष्ठे 100 (कव्हर सह) आकार 1/8 मुल्य 100/- विषय इंग्रजी शब्दकोश वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 225500, 9975873569 sunildadapatil@gmail.com o राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अर्श - मैत्री ग्रंथालयाकरिता शिफारस केलेले पुस्तक... o किशोरवयीन मुलींचे भावविश्व हळुवारपणे रेखाटन केलेले पुस्तक - एक कळी उमलतांना (किशोरवयीन मुलींच्या कथा) संपादक - बाबुराव शिरसाट प्रतिक प्रकाशन, प्लॉट # २३, सुश्रुषानगर, देवकर पाणंद, कोल्हापूर, जिल्हा - कोल्हापूर दूरध्वनी - ९७३०४०८५९० मुल्य - ९० रुपये + (टपाल खर्च रुपये १० = एकुण १००/-) पृष्ठ संख्या - ८४ विधिलिखित H¥$îUm nmQ>rb ho O¶qgJnwamVë¶m H$mhr hOma gd© gm‘mݶ ‘ܶ‘ dJm©Vë¶m bmoH$m§‘Ybo EH$ "gmYo gwYo' ì¶{º$‘Ëd. ‘r gmYo gwYo hm eãX ‘wÔm‘ AYmoao{IV Ho$bm Amho. ˶mMr XmoZ H$maUo AmhoV. EH$ åhUOo gmYo AgUo ho Iyn AdKS> Amho. ‘‘To be simple is very difficult’’. OÝ‘mZ§Va H$mhr df} gJioM gmYo, gmono, Am{U gai AgVmV. nU Z§Va Hw$R>oVar gmYonUmMr OmJm, MbmIr, gmononUmMr OmJm, g’$mB©XmanUm Am{U gainUmMr OmJm diU§ ¿¶m¶bm bmJVmV. gÎmar Amobm§S>boë¶m H¥$îUm nmQ>rb ¶m§Zr Amnb§ gmYonU ‘ZmnmgyZ Onb§ Amho. Xþgao H$maU åhUOo ¶m gmYonUm‘mJo {XbXma, H$b§Xa Am{U hahþÞar ‘mUyg XS>bm Amho. Mm§JwbnUm, CXmÎmVm, göX¶Vm, YmS>g, àg§JmdYmZ Am{U Vab ~w{Õ‘Îmm ho JwU ˶m§À¶mV CnOVM hmoVo. ˶m JwUm§Mr ˶m§Zr Am¶wî¶^a OmonmgZm Ho$br. åhUyZ H¥$îUm nmQ>rb ¶m§Zm ‘r gmYm gwYm åhQ>b§. H¥$îUm nmQ>rb Oo OJbo, Ogo OJbo ˶mVbo H$mhr àg§J ˶m§Zr Ogo KS>bo Vgo ¶m nwñVH$mV eãX~Õ Ho$bobo AmhoV. VWmH${WV à{V^md§V boIH$m§Zr AmoTy>Z VmUyZ {b{hboë¶m H¥${Ì‘ H$Wm§À¶m nmoe©^y‘rda H¥$îUm nmQ>bm§À¶m ¶m am§JS>çm ^mfoV {b{hboë¶m Iè¶m Iwè¶m, AH¥${Ì‘ H$Wm Oem ‘m¶m ‘Zmbm ^mdë¶m Vem Aݶ dmMH$m§Zmhr Z¸$sM ^mdVrb Ago ‘bm dmQ>Vo. ˶m§À¶m ^mfm e¡brbm ‘r "am§JS>m' hm eãX dmnabm Agbm Var CJmMM OmUyZ~wOyZ J«m‘rU EodOr J«må¶ Am{U An^«§e ‘amR>r ˶m§Zr dmnabr Zmhr. hr ‘m¶mgmR>r Iyn g‘mYmZmMr Jmoï> Amho. ˶m§À¶m H$Wm§‘YyZ ‘Zwî¶ OrdZmÀ¶m AZoH$ n¡by§Mo CÎm‘ Xe©Z KS>Vo. ¶m H$Wm‘ܶo Ogm Omoe Amho, Ver H$ê$Um Amho. Ogo YmS>g Amho, Ver göX¶Vm Amho. Oer H$V©ì¶ H$R>moaVm Amho, Ver g§doXZerbVm Amho. Am{U Oer ‘mUwgH$s d ‘XV H$aʶmMr d¥Îmr Amho, VgoM H$R>rU àg§Jr AZmoiIr bmoH$m§Mo ghH$m¶© {‘idʶmMo H$g~nU Amho. ˶m§À¶m gJù¶mM H$Wm dmMH$mbm Jw§VdyZ R>odUmè¶m AmhoV. "O„mof' Am{U "~m§JS>çm' ¶m H$Wm‘YyZ ˶m§À¶m ~mbnUrMm hþS>nUm, YmS>g Am{U AmìhmZm§Zm AmË‘{dídmgmZo gm‘moao OmʶmÀ¶m d¥ÎmrMo gw§Xa {MÌU Pmbo Amho. सर्व साधारण जीवनातल्या बाबी - गप्पागोष्टी - सुखदुख: आपल्या माणसाला सहजगत्या बोलता - बोलता सांगावीत अशी कथन केली आहेत. सहज साधी सरळ सोपी बोलीभाषात लिखाण असलेमुळे मनाला भावते. सर्वच कथा मध्ये कृष्णा पाटील निवेदक / सूत्रधाराची भूमिका बजावत त्या कथन करतात त्यात ते स्वत: समावेशित आहेत. "AmB©' gma»¶m H$Wo‘YyZ {dñH${iV Hw$Qw>§~ ì¶dñWoMm d g‘mO OrdZmMm {dXmaH$ Moham ˶m§Zr g‘moa AmUbm Amho, Jmodm Vo O¶qgJnya hm ˶m§Mm ñHy$Q>adaMm àdmg Va AmnU ñdV:M H$arV AmhmoV AgoM dmMH$mbm dmQ>ob. "bim' Am{U "YaUr‘mVm' ¶m gma»¶m H$Wm Jar~rMo Am{U ˶mVyZhr ñdm{^‘mZ d g§doXZerbVoZo OJUmè¶m OJmMo g‘W©nUo Xe©Z KS>dVmV. H¥$îUm nmQ>rb ¶m§Mr ^mfm, eãX à¶moJ d e¡br ~mb~moY Am{U amoIR>moH$ Amho. ˶mbm {gÕhñV boIUrMm ~mO Ambm Zmhr ho EH$m Ñï>rZo ~ao Pmbo Ago ‘bm dmQ>Vo. ˶mV H$mhr ì¶mH$aUmÀ¶m MwH$m AgVrb, H$mhr {R>H$mUr H$Wm AMmZH$ gwê$ Pmë¶mgma»¶m dmQ>VmV, H$mhr {R>H$mUr ^mdZm Am{U ñd^md ¶m§Mo {MÌU AmUIr {dñVmamZo ìhmdo Ago dmQ>Vo. Va H$mhr H$Wm Iyn AMmZH$ Am{U bdH$a g§në¶m Aer hþahþa ‘Zmbm bmJVo. nU øm H$mhr H$‘VaVm boIH$mMo ì¶{º$‘Ëd Am{U H$Wm~rOmMr VmH$X OmñV àH$fm©Zo g‘moa AmUʶmV ¶eñdr R>abo AmhoV. H¥$îUm nmQ>rb ¶m§À¶m H$b§Xa Am¶wî¶mbm "{bIV§' H$aʶmMo H$m‘ S>m°. gw{Zb nmQ>rb ¶m§Zr Ho$bo Amho. Hw$R>ë¶mhr ‘mUgmVrb gwá à{V^m emoYʶmMo H$m¡eë¶ gw{ZbH$S>o Amho. d ˶m à{V^obm "{bIV§' H$aʶmgmR>r nmR>nwamdm H$aʶmMo H$g~hr ˶mÀ¶mH$S>o Amho. gwZrbZo hm H$Wm g§J«h àH$m{eV H$ê$Z EH$ PmH$bm, gmYm ‘mUyg g‘moa AmUë¶m~Ôb ‘r ˶mMo A{^Z§XZ H$aVmo. Am{U H¥$îUm nmQ>rb ¶m§Zr ¶mZ§Vahr Amnbr AZw^dmMr {eXmoar eãXmV ‘m§S>mdr Aer Anojm H$aVmo. - ‘oOa àH$me nmQ>rb o पुस्तकाचे नाव: विधिलिखित o प्रस्तावना: मेजर प्रकाश पाटील ({ejU Vk, {MÌnQ> {Z‘m©Vo d gm{hp˶H$) o लेखक: कृष्णा ज्ञानू पाटील o प्रकाशक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील o प्रकाशन: शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर o पृष्ठे: 76 o मुल्य: 50 o संपर्क: 9890559700, 9975873569, sunildadapatil@gmail.com जागर विजयकुमार दत्तू पोवार हे ग्रामीण परिसरात राहून काव्य लेखन करणारे मनस्वी वृत्तीचे कवी आहेत, त्यांच्या 'जागर' या पहिल्या काव्यसंग्रहात विविध विषयावरील 50 कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. 'जागर' या पहिल्याच कवितेत ज्ञान आणि कर्तृत्व शक्तीचे महत्व त्यांनी विशद करून सांगितले आहे, 'प्रार्थना' या कवितेतून 'सकल जीवांचे संकट हरावे, सर्वांचे कल्याण करावे' अशी ते ईश्वराची करुणा भाकतात आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या 'पसायदाना' ची आठवण करून देतात. जीवनातील यशाची गुरुकिल्ली ते सत्वशील साधनेतून शोधतात. 'गान कोकिळा' या कवितेत त्यांनी लता मंगेशकरांच्या गायन कलेची थोरवी गायिलेली आहे. पिंज-यात बंदिस्त असलेल्या पक्षांपासून पोटासाठी शरीर विक्रय करणा-या वेश्येपर्यंत अनेक जीवांच्या व्यथा त्यांनी आपल्या काव्यातून मांडलेल्या आहेत. 'स्फूर्ती' या कवितेतून त्यांनी क्रांतिवीरांच्या शौर्याची गाथा गायिलेली आहे. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार असल्याचा मंत्र वाचकांना त्यांनी 'तूच तुझा रे गुरु' या कवितेतून दिलेला आहे. 'आई' या कवितेत मातेची महती 'त्रिभुवनी पाहू जाता अन्य दैवत ते नाही' अशा शब्दातून गायिलेली आहे. लोकशाहीचे धिंडवडे काढणा-या स्वार्थी राजकारण्यांवर शब्दांचे त्यांनी कोरडे ओढलेले आहेत. बापाची थोरवी त्यांनी 'बाप म्हणजे काय? डोईवरचं आभाळचं हाय' अशा समर्पक शब्दात सांगितली आहे. ऊस तोड करणा-या कुणब्यांच्या कष्टांचे आणि संकटांशी झुंजण्यास सिद्ध असणा-या हिमतीचे त्यांनी 'ऊसतोड कुणबी' या कवितेत कौतुक केलेले आहे. काही कवितांमधून सुंदर निसर्गाचे वर्णनही आलेले आहे. एकंदरीत सर्वस्पर्शी विषय, समर्पक आशय आणि साध्या सोप्या भाषेतील अभिव्यक्तीमुळे श्री. पोवारांचा 'जागर' हा काव्यसंग्रह रसिक मनाचा वेध घेणारा निश्चितच आहे. - श्याम कुरळे, कोल्हापूर o मुल्य ६० रुपये कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर






कविता सागर जानेवारी 2014
मध्ये जर काही साहित्यिक, संपादक किंवा प्रकाशक यांना आपल्या पुस्तकांचे परीक्षण प्रसिद्ध करावयाचे असल्यास त्यांनी
संपर्क साधावा, त्यांच्या साहित्याला आम्ही हजारो वाचकांपर्यंत पोहचवू.
02322 225500, 9975873569

प्रेरणादायी विचार
Encouraging Thoughts

कविता सागर प्रकाशनाचे कार्यकारी संचालक आणि माझे मित्र डॉ. सुनील पाटील यांनी सौ. संजीवनी सुनील पाटील द्वारा संकलित 'प्रेरणादायी विचार' हा सुविचारांचा संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्या हाती देवून गेले. सर्व सुविचारांचे मी प्रथम वाचन केले. विविध विषयावरील सुविचारांचे संकलन करण्याचा अनोखा छंद या संग्रहाच्या रूपाने कळून आला. तो वाचता - वाचता हाती अमुल्य ठेवा गवसल्याची जाणीव झाली.

कोणत्याही साहित्याचे वाचन करतांना त्यामध्ये मनाला भावणारी अनेक वाक्ये सापडतात; ती वाचल्यानंतर विसरता येत नाहीत. त्या वाक्यांचा मनावर सखोल परिणाम होतो. हि वाक्ये थोर संतांची असो अथवा साहित्यिकांची, पण त्यातील प्रेरणादायी विचार हे जीवनाला स्पर्शून जाणारे, मनाला बळकटी देणारे असतात. ह्या विचारांमध्ये जीवाला उन्नत बनवून त्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद असते. प्रेरणादायी विचार अंधारलेल्या मनाला प्रकाशाची दिशा दाखवण्याचे काम करतात. मानवी मनाला सुखाचे क्षण देणारे, दु:खातून जिद्दीने जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याची ताकद प्रेरणादायी विचारातून व्यक्त होते, हा विविध विषयावरील शेकडो विचारांचा संग्रह म्हणजे मौल्यवान ठेवाच आहे. संजीवनी पाटील यांनी संकलित केलेले विविध विषयावरील सुविचार अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचे असून त्याची मांडणीसुद्धा मराठी वर्णाक्षरानुसार केलेली आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या संकटातून वाचवण्याचे व यशस्वी करण्याचे सामर्थ्य सुविचारात आहे. याची प्रचीती आम्हाला दैनंदिन व्यवहारातून येते. एक सुविचार वाचला तर पुढील सुविचार वाचावा अशी उत्कंठा वाढवणारे व लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच प्रेरणादायी विचार हे पुस्तक आवडेल याचा मला विश्वास आहे.
प्रत्येक क्षण आपण कसा जगू शकतो आणि त्यातून कोणता अनुभव घेवू शकतो या बाबत वाचकांना मार्गदर्शन करणारे प्रेरणात्मक विचार संकलकाने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या आनंदासाठी संकलित केलेले आहेत. जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घेवून त्याला सुंदरता व सौंदर्यभावना वाढीस लावणारा हा संग्रह आहे.

या संग्रहातील अनेक प्रेरणादायी विचार वाचकांच्या मनात रुजतील व त्यांना स्वतंत्रपणे विचार करावयास भाग पाडतील आणि त्यातूनच त्यांना आपल्या अंतर्मनाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळेल. सुविचार वाचनाबरोबर त्याचे चिंतन केले पाहिजे, त्यामुळे आचार विचारात बदल होतो आणि जीवनाची फुलणारी वाटसुद्धा त्यातून सापडू शकते असे मला वाटते. 

आपल्या प्रापंचिक जीवनातून वेळ काढून वेचक सुविचार संग्रहित करून ते पुस्तक रूपाने वाचकांच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल संजीवनी पाटील यांचे अभिनंदन ! भावी काळात आपल्या संग्रहातून, लेखनातून पुढील कार्य यशस्वीपणे घडावे यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

                                                                        - नंदकुमार शंकरराव गायकवाड 


पुस्तकाचे नाव
प्रेरणादायी विचार
संकलक
सौ. संजीवनी सुनील पाटील
आवृत्ती
प्रथम
ISBN
978-81-926535-6-3
प्रकाशक
डॉ. सुनील पाटील
प्रकाशन
कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर
पृष्ठे
60 (कव्हर सह)
आकार
1/8
मुल्य
60/-
विषय
प्रेरणादायी विचारांचा संग्रह
वर्गवारी
शैक्षणिक
संपर्क
02322 - 225500, 9975873569, sunil77p@rediffmail.com
पोटपाणी
दुष्काळी वेदनेचा रोष - आक्रोश व्यक्त करणारा अनोखा कविता संग्रह ...

एखाद्या सामाजिक समस्येने मानस त्रस्त होतात, आणि त्या समस्येच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवू लागतात. आज अशा अनेक समस्या समाजव्यवस्थेत काटेरी रूप धारण करू लागल्या आहेत. ग्रामीण समाज व्यवस्थेच्या कपाळी तर हा भोगवटा खिळयासारखा ठोकलेला दिसून येतो आहे. आणि त्या ठणकेने समाजमन ठणकू लागलेले आहे. सर्व गोष्टींच्या टंचाईचा फटका आधी खेड्यापाड्यांना बसतो. शहरे मात्र ह्याच सोयी सुविधा खेड्यातून, खेड्यातल्या माणसांकडून, जमिनीकडून, ओरबाडून - हिसकावून आणत आहेत. कारण व्यवस्थाच त्यांच्या भल्याची झालेली आहे. म्हणूनच खेड्यांच्या मातीत पिकणा-या हिरव्या भाजीपाल्यापासून तर डोंगरकड्यांच्या दगड - मुरमाचा ओघ शहराकडे जातो आहे. तेथील रस्ते पॉश, चकचकीत होताहेत आणि खेड्यात, रस्त्यात खड्डा आहे कि खड्ड्यात रस्ता आहे हे कळेनासे झाले आहे. अशा अवस्थेत सहाजिकच खेड्यातला माणूस अभावग्रस्त होवून कातावतो आहे. आक्रंदन करतो आहे. त्यातल्या त्यात तो माणूस जर संवेदनशील असेल तर हा आक्रोश शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. नव्या पिढीत खेड्यातून लिहिणारा असा जो कवी - लेखकांचा वर्ग आहे. तो या समस्यांना  शब्दांच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यापैकी अनिलकुमार पाटील हे एक नाव आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला एक भान आले आहे. ते भान समाज विषयक जसे आहे, तसेच साहित्य विषयक सुद्धा आहे. समाज आणि साहित्य यातील परस्परसंबंधाचे आकलन या संवेदनशील पिढीला होत आहे. साहित्य हे सामाजिक समस्या मांडण्याचे मध्यम आहे. हे कळून आल्यामुळे आपणही साहित्यनिर्मिती करून या समस्यांना मुखर करावे अशी उर्मी तरुण पिढीच्या मनात येणे सहाजिकच आहे. ही उर्मी येण्याचे आणखी एक कारण असे की, गेल्या दशकात ग्रामीण भागातील साहित्यिकांनी जी साहित्यनिर्मिती केली आहे. कधी ती समस्या तात्कालिक  स्वरुपाची होती. कधी प्रादेशिक स्वरुपाची तर कधी प्रादेशिकतेच्या खुणा ओलांडून पलीकडे जाणारी सर्वव्यापी होणारी होती. अशा समस्याप्रधान साहित्य निर्मितीच्या वाचनातून एक नवा वाचक वर्ग जसा निर्माण झाला तसाच लिहिणारा लेखकवर्ग सुद्धा निर्माण झाला. अर्थात साहित्य निर्मिती ही काही सहजसाध्य होणारी सोपी बाब नाही. त्यासाठी आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा,  वाड:मयीन वारश्याचा जसा अभ्यास पाहिजे तशीच अखंड साधना सुद्धा महत्वाची आहे. निर्मितीमागे गांभीर्य सुद्धा महत्वाचे आहे. 

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तर ही लिहिण्याची जबाबदारी अंगावर घेणे म्हणजे पौराणिक काळातील शिवधनुष्य पेलण्यासारखे झाले आहे. कारण आज फक्त आपल्याच वाड:मयीन परंपरांचे भान, साधना आणि सातत्य असून चालत नाही. तर फार मोठा अभ्यास, जागतिक स्तरावरच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक झाला आहे. त्यातूनच आपल्याला आपली मुळे सापडण्याची शक्यता आहे.

असे असले तरी आज फार मोठ्या प्रमाणात काव्य निर्मिती होताना दिसते. त्यामागे सहज उपलब्ध होणारी प्रसिद्धी ही बाब जशी आहे. तशीच उत्कट उर्मी ही सुद्धा महत्वाची आहे. एखाद्या वाचनानंतर ह्या भावउर्मी मनात निर्माण होतात. आणि विविध आकृतिबंधाच्या माध्यमातून त्या शब्दरूप होतात. त्यामुळे लिहिले जाने हे जसे महत्त्वाचे आहे. तसेच छापले जाणे सुद्धा महत्त्वाचे आहे. कारण त्यातून मिळणारे भावनिक विरेचनाचे सुख सुद्धा मोठेच असते. आपण आपली वेदना मांडली असे समाधान एक प्रकारचे आत्मबल देत असते. त्यामुळे या निर्मितीला दाद देणे महत्त्वाचे ठरते.

अनिलकुमार पाटील यांनी आपल्या परिसरातील वेदना भोगली, आणि काही भावतरंग त्यांच्या मनात आले. त्या भावतरंगाना त्यांनी शब्दबद्ध केले. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. सांगली जिल्ह्यातील ज्या परिसरात ते राहतात. त्या परीसारीतील पाणी प्रश्न केंद्रस्थानी ठेवून त्यांनी एका उत्कट उर्मीत ह्या कविता लिहिल्याचे दिसून येते. कृष्णा नदीच्या पात्रापासून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावरच्या तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जात, सांगोला या कायम दुष्काळी भागाला धो धो पडणा-या पावसाने आणि नेते म्हणवून घेणा-या माणसांनीही पाण्यापासून कायम वंचित ठेवले आहे. असे त्यांचे मत आहे. खरे म्हणजे प्रत्येक भाग ही वंचना भोगतो आहे. ती विविध प्रादेशिक स्वरुपाची आहे. पण यापाणी समस्येला कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करावे हा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे पाणी प्रश्नावर फार मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मितीही सातत्याने होताच आहे. पाण्याअभावी होणारी होरपळ हा जसा 'तहान' कादंबरीचा विषय आहे. तशीच कविवर्य ना. धो. महानोर यांची -
'पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी
पाण्याविना दाहीदिशा आम्ही अनवाणी
ही एकच कविता पाण्याच्या अभावाचे समग्र चित्रण करणारी कविता आहे. केवळ पाणीटंचाईचे वर्णन करूनच महानोर थांबले नाहीत, तर शेतीसाठी पाणी कसे तयार करावे हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे अनेक संशोधक, पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते या प्रश्नांचा आढावा घेत आहेत. त्यावर विविध अंगाने लेखन होत आहे. अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे आयोजन सुद्धा अनेक  वेळा झाले आहे.

हाच पाणीप्रश्न अनिलकुमार पाटील यांच्या सुद्धा आस्थेचा विषय आहे. म्हणूनच आपल्या विविध कवितांमधून ते या प्रश्नच विविध अंगाने आढावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या संग्रहातील 'राजपुत्राचे अपहरण' या कवितेतून सुर्य आणि चंद्र या प्रतिमा वापरून पाऊस म्हणजे आमचा राजपुत्र आहे. आणि त्याला सुर्य पळवून नेतो आहे. असा आरोप ते करतात पाऊस पडण्याच्या प्रक्रियेचा वैज्ञानिक दृष्टीकोन बाजूला ठेवला तरी यातील भावनात्मक बाजू त्यांच्या काळजाचा कंप व्यक्त करते. आणि विद्रोहाची भाषा सुद्धा बोलते. पाणी टंचाई; दुष्काळ या मुळे हे मन एवढं त्रस्त झालं आहे की ओरिसामध्ये महापूर आला त्यामुळे तेथील जनजीवन त्रस्त झालं हे कळूनही त्याचं तहानलेलं मन म्हणत -
माझ्याही गावात
महापूर आल्याची बातमी घेऊन
एखाद वर्तमानपत्र यावं...
अशी अपेक्षा करते. यातून त्यांच्या तप्त तहानेची दाहकता लक्षात यावी. तहानपूर्तीसाठी हे मन पावसामुळे होणारे महापुराचे नुकसान सोसायला सुद्धा तयार आहे. कारण पावसाअभावी गाव सोडून परांगदा होणारे गावकरी पाहण त्यांना आता असह्य झालं आहे. त्यांची 'गीत नवे' हि कविता  म्हणजे तर या पावसाला 'प्रार्थना दयाघना' च्या रुपात केलेली नवी प्रार्थनाचं आहे. म्हणूनच ते समाजमनाला या प्रश्नावर पेटून उठण्याचे आवाहन करतात. हे आवाहन 'हल्लाबोल' च्या स्वरूपाचे -
रखडलेल्या योजनांचा
जाब कधी विचारणार आहे
पात्यावर पाते घासल्याशिवाय का -
'धार' पात्यास चढणार आहे?
अशा दाहक शब्दांचे हे हल्लाबोल आहे. म्हणूनच पाणी प्रश्न हा त्यांना आपल्या जखमेवरचा घाव वाटतो. हा कौरव कुटीलतेचा डाव लोकांनी मनापासून समजावून घेतला पाहिजे. असे झाले नाही तर; हा डाव उधळून लावला नाही तर आणखी एक गाव विस्थापित होणे अटल आहे. त्यामुळे येथील कारभारी सुद्धा आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यात हतबल ठरतो आहे. मी तुला जरीचं लुगडं घेऊ शकणार नाही कारण शेतारानातल्या पिकाला पाणी देणारं माझं फावड आता बंद झालं आहे. बाजारासाठी रोकडही देवू शकत नाही, कारण पाण्याची कावडचं बंद झाली आहे. या वैतागवाण्या परिस्थितीत जगण्यापेक्षा म्हणूनच घरधनी आपल्या कारभारणीला वैतागून म्हणतो -
चल, जाऊ इथून
जीण झालंया नागड
केठेतरी लपवू -
मन मातीच त्रांगड ...
हे त्रांगड फक्त आभाळातून पडणा-या पावसाने निर्माण केलं नाही, तर त्याला कृष्णा खो-यातील पाणी वाटपाचा सुद्धा संदर्भ आहे. असे अनेक कवितांमधून कळून येते.

खरिपामध्ये पावसाची एखादी बखाड पडली तर सरकारकडून कृत्रीम पाऊस पाडला जाईल, ते शक्य होईल. पण धरण आहे, पाट आहे आणि त्या पाटाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होत नसेल तर मात्र काय? त्यासंदर्भात काही तरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे. असा जो या कवीचा आक्रोश आहे. मागणं आहे. ते मागणं फक्त एका कवीचं, किंवा व्यक्तीचं राहत नाही, तर त्याला एका प्रदेशाचा संदर्भविस्तार प्राप्त होतो. कधी - कधी मग या संदर्भात आपणच का बोलावे; असा वैतागून सूरही कवी व्यक्त करतो. त्यातून -
सगळ्यांनाच आनंद होतो, शिकार वाटून घेताना
मग मीच का बार टाकून उडवावेत छरे?
अशा विधानार्थी ओळी निर्माण होतात. कारण या वणव्यात त्यांना आपलं गणगोत सुद्धा होरपळताना दिसतंच असतं. जखमनामा, मोटच पाणी, पोटपाणी, अजून गप्प कां, शीळ, टाहो अशा सर्वच कविता 'पाणी' या विषयाला केंद्र करून त्यांनी लिहिल्या आहेत. या प्रश्नावर त्यांनी कधी गोफणगुंडांचा विद्रोही मार्ग सुचविला आहे. कधी टाहो फोडला आहे. तर कधी कधी काही व्यक्तींच्या व कुटुंबांच्या माध्यमातून या समस्येचे तपशील सुद्धा दिले आहेत. एकाच विषयाभोवती बहुतांशी कविता केंद्रित केल्यामुळे पुनरावृत्तीचा अटळ धोकाही त्यांना या संग्रहात पत्करावा लागला आहे, परंतु त्यांची संवेदना समजून घेण्यासारखी आहे. या विषयावर ना. घो. महानोराप्रमाणे खंडकाव्य लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असे दिसून येते.

पाण्याभोवातीचे भावतरंग हा बहुतांशी कवितांचा विषय असला तरी इतर विषयावर सुद्धा ते चांगल्या प्रकारे कविता लिहू शकतात. त्या खुणाही संग्रहातील इतर कवितांमध्ये दिसून येतात. 'शिवराम खरारे' हे व्यक्तीचित्र सुद्धा लक्षवेधी झाले आहे. व्यक्तींना केंद्र करून कविता करण्याचे कसब इंद्रजीत भालेराव यांनी साध्या केले आहे. तसा प्रयत्न काही कवितामधून दिसून येतो. 'सांजसंकेत' ही कविता सुद्धा प्रभावी आहे. एक चांगल्या कवितेची बीजे या कवितेत आहेत. आशयदृष्ट्या प्रामाणिक असलेली अशी ही कविता आहे. 'सांजसंकेत' ही कविता प्रादेशिक बोलीभाषेशी प्रामाणिक राहून लिहिल्यामुळे अधिक सरस ठरली आहे. या संवादी कवितेतून कुटुंबस्वस्थाकडे निर्देश केला असून स्त्रीच्या मनातील एक सुप्त भय साकार करण्यात यशस्वी ठरला आहे.
'तसं, तू म्हणू नगस
त्यो कुठबी जात नसलं
बापयाची जात हाय
येता जाता कुठबी फसल...
या लोक भाषेतील लयीत 'स्त्री' च्या मनाचा घेतलेला वेध वास्तवदर्शी, तेवढाच भावूक व काव्यमय झाला आहे. या वाटेने त्यांची वाटचाल सुरु राहिली तर समाजमनातील असे अनेक 'काव्यमोती' त्यांना गवसू शकतील. अशी आशा बाळगायला हरकत नाही. 

                                                                                              - सदानंद देशमुख

पुस्तक
पोटपाणी
कवी
अनिलकुमार पाटील
प्रकाशक
सौ. रेखा पाटील
प्रकाशन
अभिरुची प्रकाशन, जयसिंगपूर
पृष्ठे
100 (कव्हर सह)
आकार
1/8
मुल्य
60/-
विषय
दुष्काळी वेदनेचा रोष - आक्रोश व्यक्त करणा-या कविता
वर्गवारी
कविता संग्रह
संपर्क
02322 - 222144, 9420011417

इंग्रजी शब्दसंग्रह वाढविण्यासाठी एक उत्तम पुस्तक
क्रियापदांचा खजिना

संगणकाचा कितीही प्रसार झाला आणि इंटरनेटच्या माध्यमातून कितीही माहिती उपलब्ध झाली; तरी ग्रंथांचे महत्व आणि अस्तित्व कायम याहते, या जगभर आलेल्या अनुभवाच्या आधारे कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूरने इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी एक उत्तम पुस्तक "क्रियापदांचा खजिना" या नावाने इंग्रजी - मराठी शब्दकोश प्रसिद्ध केला आहे. अवघ्या पन्नास रुपयात तो सर्वत्र उपलब्ध आहे.  इंग्रजी शब्दांचा अर्थबोध झाला नाही, तर शब्दकोश पाहण्याची सवय अनेकांना होती; पण आता नव्या जगात शब्दकोशाचे वाचन करून विविध शब्दांच्या अर्थछटा समजावून घेवून आपली भाषा समृद्ध करण्याकडे कल वाढला आहे. या शब्दकोशाचे संपादन प्रसिद्ध इंग्रजी शिक्षक राज धुदाट यांनी अथक प्रयत्न पूर्वक केले, त्यांच्या योगदानातून 'क्रियापदांचा खजिना' हा शब्दसंग्रह आकाराला आला. या साठी देखणा टाइप आणि उत्तम दर्जाचा कागद वापरला आहे. राज धुदाट यांच्या अथक प्रयत्नानंतर सिद्ध झालेल्या या शब्दकोशानंतर ते आणखीही शब्दकोशाचे काम "कविता सागर" प्रकाशनासाठी करत आहेत.

मातृभाषेतून शिक्षण द्यावे कि नाही, यावर खरे तर आपल्या देशाचे राष्ट्रीय धोरण असायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ यावर मतप्रदर्शन करणार आहे, ही उत्तम बाब आहे; पण ते करण्यापूर्वी या प्रश्नाचा सर्व बाजूंनी अभ्यास, संशोधन करणारे रिसर्च संशोधक नेमून त्यांचा विचार घेणेही आवश्यक ठरेल. मातृभाषेत शिक्षण घेतले की मुलांचा ते ज्ञान आत्मसात करण्याकडे कल अधिक असतो, असे सांगणारी मंडळी आहेत, पण मुले लहान वयात एका वेळी अनेक भाषा सहजपणे शिकू शकतात आणि उलट ती जितक्या अधिक भाषा आत्मसात करतील तितक्या त्यांच्या भाषिक विकासाच्या दृष्टीने ते चांगले आहे. त्यामुळे घरी मातृभाषा आणि इंग्रजी ज्ञानभाषा, हे सूत्र किमान काळाची गरज ओळखून तरी आपण अंगीकारायला हवे. आपल्या भाषिक राज्यपद्धतीत त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेला महत्व आहे; पण जातीक घडामोडींचा विचार होतो, तेंव्हा प्रादेशिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय धोरणालाच अधिक महत्व असते. साधा विचार केला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठा झाल्यावर नोकरी-व्यवसायानिमित्त दुस-या राज्यात किंवा देशात गेला तर तो कोणत्या भाषेत व्यवहार करणार आहे? आपल्या देशातील विद्यापीठामध्ये, आयआयटी, आयआयएम्स मधली ज्ञानभाषा कोणती आहे?
dkghapk baxzth’kh 36 pk vkdMk vlrks R;keqaGs rs Lor%yk baxzthiklwu pkj gkr nwj jkg.ks ilar djrkr- R;akuh pqdhpk let d:u ?ksryk vkgs dh] baxzthr laHkk"k.k dj.ks R;kaP;klkBh v’kD; vkgs- i.k eh rqEgkyk lkaxrks v’kD; e/;sp ’kD; nMysys vkgs gs R;kaP;k y{kkr ;sr ukgh vkf.k gks ßiz;Rukarh ijes’ojÞ gs rs foljysp vkgsr- Treasure of Verbs fØ;kinkapk [kftuk gs iqLrd rqeP;k gkrh nsrkauk vkEgkyk vkuan gksr vkgs- ejkBh ek/;ekP;k fo/;kF;kZaph baxzth 'kCnlaxzgkph xjt y{kkr ?ksowu ;k iqLrdkph jpuk dj.;kr vkyh vkgs- fØ;kinkaph :is ekghr ulY;kus fo/;kF;kZauk xks"V Ikq.kZ djk]i= fygk] fuca/k fygk ba- iz'u vo?kM tkrkr R;keqGs R;kauk baxzth fo"k;kr deh ekdZl iMrkr o R;kpk ifj.kke R;kaP;k ,dw.k VDdsokjhoj gksrks- rlsp baxzth laHkk"k.k djrkauk lq/nk ;ksX; fBdk.kh ;ksX; fØ;kin u okijY;kus gks.kkÚ;k pqdkaeqGs R;kapk vkRefo'okl [kkykorks- fo|kF;kZaapk 'kCnlaxzg ok<kok Eg.kwu ;k iqLrdkr nSuafnu okijkrhy loZp fØ;kinkapk lekos'k dsyk vkgs- fo|kFkkZauk ijh{ksr tkLrhr tkLr ekdZl feG.;kcjkscj baxzth laHkk"k.k iDds dj.;klkBh ;k iqLrdkpk mi;ksx gksbZy vlk vkePkk fo'okl vkgs- dqBY;kgh {ks=kr baxzthpk okij vVG vlY;keqGs baxzthyk Qkj EkgRo izkIr >kys vkgsr vkf.k R;keqaGsp gYYkh tkxkstkxh baXyh’k fLidhax Dyklsl igk;yk feGrkr f’kok; baxzth f’kdo.kkjh vusd iqLrds] dWLksVl ] osclkbZVl miYkC/k vkgsr- baxzthyk txkph Hkk"kk ek.kys tkrs- baxzth f’kok; dfjvjp ikugh gkyr ukgh vls EgVY;kl okoxs Bj.kkj ukgh- baxzth ;sr ulY;kus foKku ’kk[ksyk tk.;kph bPNk iw.kZ u >kY;kus nq[kh >kyys fo|kFkhZ o pkaxY;k ixkkjkph uksdjh u feGky;kus grk’k >kkysys r:.k vkiY;kyk tkxkstkxh HksVrkr- baxzth gh fo’olaoknkph Hkk"kk d’kh f’kdrk ;sbZy\ ;k iz’ukph vusd mRrjs vkgsr- tls dh baxzth orZekui=] ekfld fdaok iqLrd  okp.ks- baxzth ckrE;k ,sd.ks] O;kdj.kkps fu;e ikB dj.ks] baxzths ;ssrs R;kP;k’kh eS=h dj.ks] bafXy’k fLifdapk Dykl tkWbZu dj.ks bR;kanh- ijarw ;k lokZ is{kk egRokph xks"V Eg.kts baxzth f’kd.;kph  ftÌ goh vkgs- dkj.k cÚ;kp osGk vki.k fu.kZu ?ksrks dh vkt iklwu baxzth ckrE;k ,sdk;P;k] njjkst fMD’kujhrwu ngk & fol ’kCn ikB djk;ps] fe=k’kh baxzthrwup cksyk;ps- dkgh fnol fu.kZ; ?ksrY;kizek.ks vki.k okxrksgh i.k dkgh dkj.kkeqGs gs fu.kZ; tkLr fnol fVdr ukghr o vki.k eqG fBdk.kh ijr ;srks-
vesfjdsr  ,dk xjhc ?kjkr tUeysyh foYek :MkWYQ ftÌhp ,d vnHkqr mnkgj.k vkgs- ygk.ki.kh foYekyk iksfyvks >kyk- MkWDVjkus lkafxrys dh] rh d/khp pkyw ’kd.kkj ukgh- i.k frP;k vkbZus fnysY;k  izksRlkgkus frus txkkrhy lokZr osxoku L=h gks.;kps LoIu ikghys-  o;kP;k uoO;k o"khZ MkWDVjkapk lYYkk u tqekurk  frus pkyk;yk Lkq:okr dsyh- o;kP;k rsjkO;k o"khZ /kko.;kP;k ’k;Zrhr mrjyh o rh lokZr ’ksoVh vkyh अशाप्रकारे frus vusd ’k;Zrhr Hkkx ?ksryk o rh lokZr ’ksoVh ;sr jkghyh- foYek frP;k ftÌh eqGs ,ds fno’kh vkWfyEihdyk ;sÅu iksgpyh- rsFks frph Li/kkZ d/khgh  u gkjysY;k  T;qVk gsbuh ukokP;k L=h’kh >kyh- 100 ehVj] 200 ehVj o  400 ehVj ¼xV’kZr½  /kko.;kP;k ;k frUgh ’k;Zrhr frus T;qVkyk gkjoys  fryk fru lqo.kZ inds feGkyhr  vkf.k gk bfrgkl cuyk% dh ,d fodykax L=h 1960 P;k vkWfYkfEide/;s txkkrhy lokZr osxoku L=h cuyh- ;k lR; ?kVuse/kwu vki.k f’kdrks dh] ftÌ vlsy rj vki.k dkghgh d: ’kdrks- iksfyvks >kysyh foYek /kko.;kP;k Li/ksZr ighyh ;sÅ ’kdrs rj  vkiY;kyk pkaxys cksyrk ;sr vlwu vki.k baxzth dk cksyw ’k.kkj ukgh !

भाषेमुळे आपल्या मनातले विचारभाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय  जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या  मातृभाषेचा अभिमान  असतो. परंतू  मातृभाषा सोडून आणखीन एक दोन भाषा जर येत असतील तर  त्याचा देखील आपल्याला  फायदा होतो  हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात 'Knowledge is not burden' ज्ञान हे ओझ नाही. इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढवतच जात आहे. संपर्क - माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा  शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते. जगात सुरु असलेल्या स्पर्धेचा विचार करून जगाची ज्ञानभाषा म्हणून आम्हाला इंग्रजीचा स्वीकार करावा लागेल.

एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला  शब्दसाठा वाढविल्यास शिवाय ती भाषा आपण शिकूच  शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याची  सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही . पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास. आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल. क्रियापदांचा खजिना या पुस्तकाची इंटरनेट आवृत्ती सुद्धा प्रसिद्ध झाली असून या आवृत्तीला खूप मोठ्या प्रमाणावर वाचकांनी पसंती दर्शवली आहे.                                                                                                                                                                                       - अनिल धुदाट (पाटील)



पुस्तक
क्रियापदांचाखजिना
लेखक
राज धुदाट
प्रकाशक
डॉ. सुनील पाटील
प्रकाशन
कविता सागर प्रकाशन
पृष्ठे
44 (कव्हर सह)
आकार
A 4
मुल्य
50/-
विषय
इंग्रजी शब्दकोश
वर्गवारी
शैक्षणिक
संपर्क
02322 225500, 9975873569 sunildadapatil@gmail.com



शालेय मुलांसाठी एक सर्वोत्तम निबंध संग्रह
 संवाद
निबंध हा आधुनिक गद्यलेखनाचा एक प्रकार असून, 'निबंध' या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांपैकी 'एकत्र बांधणे' किंवा 'रचणे' हे अर्थ या लेखन प्रकाराशी अधिक जुळते मिळते आहेत. एकेकाळी भूर्जपत्रांवर लेखन केले जाई व अशी भूर्जपत्रे एकत्र करून बांधत. एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध, असे म्हणता येईल. अगदी छोटे गद्यलेखन टीपा, टिप्पणी किंवा टिपण म्हणता येईल. अगदी मोठे लेखन व्याप्ती लेख, प्रबंध वा ग्रंथही म्हणता येईल. व्याप्तीदृष्ट्या या दोहोंच्या मध्ये कुठेतरी निबंध हा प्रकार बसू शकेल. एखाद्या विषया संबंधी प्रतिपाद्या समाधानकारकपणे कसे मांडता येईल, यावर लेखनाची व्याप्ती अवलंबून असते. त्यामुळे टिपा -टिपाणे आणि प्रबंध - ग्रंथ या दोहोंमध्ये कुठेतरी बसणाऱ्या निबंध लेखनातही ठराविक व्याप्ती आढळत नाही. काही निबंध लहान, तर काही दीर्घ असू शकतात. लेखना मागील उद्दिष्टही त्याची व्याप्ती तसेच ठेवण या घटकांवर परिणाम करतेच. टीपा-टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ यांसारख्या प्रत्येक लेखन प्रकाराचा घाट लेखन विषयक भूमिकेवर अवलंबून असतो.

संस्कृतमध्ये गद्यपद्यात्मक ग्रंथरचनेला सामान्यपणे प्रबंध असे म्हटले जाते. पुढे आख्यानात्मक अथवा कथात्मक काव्याला प्रबंधकाव्य म्हटले जाऊ लागले. आधुनिक परिभाषेत सामान्यपणे पीएच्. डी. साठी केलेल्या संशोधनात्मक लेखनास प्रबंध म्हटले जाते. संस्कृतात निबंध ही संज्ञा असली तरी, आधुनिक अर्थाने जी निबंधरचना अभिप्रेत आहे ती संस्कृतात नाही. पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखनप्रकार सोळाव्या शतकाच्या शेवटीशेवटी उदयास आला. त्याचा जनक माँतेन  (१५३३-९२) हा फ्रेंच लेखक मानला जातो. इंग्लिशमध्ये 'एस्से' अशी संज्ञा आहे व ती फ्रेंच संज्ञेवरून आलेली आहे. एस्से या संज्ञेचा शब्दश: अर्थ 'प्रयत्न करणे' असा आहे. इंग्रजीमध्ये निबंधवजा गद्यलेखनाला 'काँपोझिशन', 'आर्टिकल' अशाही संज्ञा आढळतात. पूर्वी 'डिस्‌कोर्स' असाही शब्द वापरत. इंग्रजीतील 'ट्रीटिज' संज्ञेला मराठीत प्रबंध म्हटल्याचे दिसते व तिची व्याप्ती निबंधाहून मोठी असते. इंग्रजीतील 'मोनोग्राफ' या प्रकारातील लेखनही एखाद्या विषयावरील संक्षिप्त पण सर्वांगीन माहिती देणारे असते. मराठीत त्याला व्यक्तिलेख असे सामान्यपणे म्हटले जाते. इंग्रजीत 'रिसर्च पेपर' (शोध - निबंध किंवा शोध - लेख) हाही गद्यलेखनाचा प्रकार असून तो संशोधनविषयक प्रतिपादनास लावण्यात येतो.

माँतेनप्रणीत निबंधात लेखकाच्या आत्माविष्काराला किंवा आत्मनिष्ठेला प्रधान्य होते. तथापि बेकन सारख्या लेखकांनी इंग्रजीत जो निबंधप्रकार रूढ केला, तो अधिक वस्तुनिष्ठ, विश्र्लेषणात्मक आणि तर्कशुद्ध मांडणीचा होता. सामान्यपणे आपण ज्याला निबंध म्हणतो, त्यात एखाद्या विषयाचे वस्तुनिष्ठ दृष्टीने केलेले विवेचन महत्त्वाचे असते. आत्मनिष्ठ निबंध हा माँतेनने स्वत:च म्हटल्याप्रमाणे, लेखकाच्या आत्मचित्रणा सारखा असतो. माँतेनच्या या आत्मनिष्ठेच्या बीजाचाच विकास पुढे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लघुनिबंध, ललित निबंध, काव्यात्म निबंध किंवा गद्य काव्य यांच्या स्वरूपात झाला. इंग्रजीत या प्रकारास 'पर्सनल एस्से' म्हणतात. पश्चिमी साहित्यात आत्मनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा या दोहोंचे प्रभाव निबंधलेखनावर सारख्याच प्रमाणात राहिल्याचे दिसून येते. अब्राहम काउली, बेकन, मेकॉले, कार्लईल, जी. के. चेस्टरटन, सॅम्युएल जॉन्सन, स्टील, अँडिसन, चार्ल्स लँब, ए. जी. गार्डनर अशी इंग्रजी साहित्यातील निबंधकारांची परंपरा पाहिली, तरी तीत हे दोन्हीही प्रकार प्रभावी राहिल्याचे आणि पुष्कळदा एकमेकांत मिसळून गेल्याचे दिसून येते.

निबंध म्हणजे 'तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना’. तथापि, ही व्याख्या निबंध, प्रबंध, ग्रंथ या सर्वच प्रकारांचा अंतर्भाव करणारी आह. वरील लक्षणांनी युक्त अशी २०/२५ पृष्ठांपर्यंतची रचना म्हणजे निबंध, त्याहून मोठी रचना (३००-४०० पृष्ठांपर्यंतची) म्हणजे ग्रंथ व या दोहोंच्या मध्ये बसणारा प्रकार म्हणजे प्रबंध होय.

वरील व्याख्येनुसार विचार प्रतिपादन किंवा विचार प्रर्वतन करणे हा निबंध लेखणाचा हेतू असतो, असे दिसेल. व्यापक अर्थाने या हेतूच्या पूर्ततेसाठी एखादा विषय घेऊन त्या विषयाची अंगोपांगे आणि अर्थपूर्णता विशद करण्याचा प्रयत्न निबंधकार करतो. निबंधाला अर्थातच अविषय असा कोणताच नाही. अगदी तात्कालिक किंवा प्रासंगिक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी वृत्तपत्रातून येणारे संपादकीय लेख किंवा इतर लेख यांनाही निबंध म्हणता येतील. साहित्य समीक्षात्मक लेखही निबंध म्हणता येतील. राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, तात्विक, वैज्ञानिक विषयांवरील एका विशिष्ट मर्यादेत विवेचन करणारे लेखही निबंध म्हणता येतील. वैचारिक पातळीवर असा काही विषयांचा परामर्श घेतला जातो, त्याच प्रमाणे व्यक्ति विषयक शब्दचरित्रेही निबंध म्हणता येतील. विनोदी लेख हेही एका दृष्टीने विनोदी निबंधच ठरतात. तेव्हा निबंध प्रकारात विषयाला कसल्याच मर्यादा नसतात; कोणत्याही विषयाची तर्कसंगत, सप्रमाण, वस्तुनिष्ठ अशी मध्यम स्वरूपात केलेली मांडणी निबंधात महत्त्वाची असते. अशी मांडणी अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकते. उदा., निबंधाचा मथळा, त्याचा प्रारंभ, त्यातील मुद्दे, उदाहरणे वा दाखले, आलंकारिकता, खंडनमंडनाची वा युक्तिवादाची पद्धत, विनोद स्थळे इत्यादी. निबंध शीर्षके आकर्षक व अर्थपूर्ण असावीत. 

पोद्‌घात-उपसंहारवजा मजकुरांनी निबंधातील विवेचनाचा अनुक्रमे परिचय व सारांश देण्याचा प्रयत्नही काही निबंधात आढळतो. दीर्घ निबंधात उपसंहाराची वा सारांशनिवेदनाची जोड दिल्यास वाचकाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. निबंधाला खरा घाट त्यातील मुद्देसुद मांडणीमुळेच लाभतो. एखाद्या विषयाच्या अंगोपांगांची क्रमाक्रमाने उकल करीत जाणारा व लेखनाचे प्रतिपाद्य परिणामकारकपणे मनावर ठसविणारा निबंध स्वत:चा एक स्वयंभू घाट धारण करीत असतो. तथापि केवळ विषयाच्या अंगोपांगांची संयुक्तिक उकल करून हा घाटप्राप्त होईलच असे नाही; तर त्याला ओघवते प्रतिपादन, त्यातीलसुबोधता व सुस्पष्टता, मार्मिक दृष्टांतादी अलंकार, चपखल युक्तिवाद, नर्म विनोद स्थळे, वेधक भाषाशैली, विचाराचा नवीन्य व एकूण अभिव्यक्तीचे स्वारस्य इत्यादींनी डौल प्राप्त होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून निबंधाला विचार सौंदर्याचा घाट प्राप्त होतो.

निबंध साहित्यात निबंधकाराच्या व्यक्तिमत्त्वालाही अर्थातच महत्त्व असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याने निवडलेले विषय, त्यांची केलेली मांडणी आणि त्याची भाषाशैली यांवर उमटलेला असतो. याचा अर्थ निबंध हा प्रकृतीने वस्तुनिष्ठ लेखनप्रकार असला, तरी त्यात लेखकाच्या आत्मनिष्ठेचे दर्शन सूचकपणे घडतेच. शैलीसारख्या किंबहुना निबंधातून सूचित झालेल्या मतांसारख्या गोष्टींवरून हे दर्शन घडते. कोणतेही लेखन हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ असणे अशक्य आहे. अगदी ऐतिहासिक वा वैज्ञानिक विषयांवरील लेखनही, अल्प प्रमाणात का होईना, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक ठरते.

आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे महाभारतातील राजधर्मासारखे शांतिपर्व प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल. रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे उदाहरणार्थ राजधर्म, सेवकधर्म यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल. इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने 'अँन एस्से ऑन क्रिटिझम' 'अँन एस्से ऑन मॅन' या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचार प्रर्वतनालाच महत्त्व आहे. तेव्हा गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्य प्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधा संबंधीचाच आहे. निबंध लेखन कठीण व दुर्लभ साहित्य प्रकार आहे. निबंध लेखनासाठी लेखकाला इतिहासाचे ज्ञान, पौराणिक कथा व सद्य परिस्थितीची जाणीव व ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.

निबंध साहित्याचा उदय पश्चिमेकडे सोळाव्या शतकाच्या अखेरीस झाला. आधुनिक भारतीय भाषांत इंग्रजी भाषा साहित्याच्या परिचयाने एकोणिसाव्या शतकात हा प्रकार रूजला. ज्या परिस्थितीत निबंधप्रकार उदयास आला, तिचा विचार करून काही विचारवंतांनी निबंध साहित्या मागील जीवनविषयक प्रवृत्ति-प्रेरणांचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्या ऐवजी बुद्धीवादाने, तर्कशुद्ध रीतीने, शास्त्रीय पद्धतीने व लौकिक भूमिकेने त्या विषयाचा मागोवा घेणे ही आधुनिक दृष्टी निबंध साहित्या मध्ये असते, असे म्हटले जाते. शब्द प्रामाण्या ऐवजी बुद्धिप्रामाण्य, समाजा बरोबर व्यक्तीचे मूल्य; पारमार्थिक निष्ठेऐवजी इहलोकनिष्ठा यांचा पुरस्कार करण्याची प्रवृत्ती निबंध साहित्याच्या मुळाशी आहे, असे म्हटले जाते. याचे प्रत्यंतर आधुनिक भारतीय भाषांतील निबंध साहित्या वरून येऊ शकते. प्रबोधनाचे सगळे प्रश्नोपप्रश्न भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळलेले आहेत. त्यामागे एक आधुनिक दृष्टीकोन आहे. आधुनिक निबंध साहित्य पाहिले, की त्यामागील इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचे अधिष्ठान लक्षात येते.

निबंध वाङमयाला उतरती कळा लागली आहे, असा एक आक्षेप घेतला जातो. निबंध याऐवजी लेख, निबंध संग्रहा ऐवजी लेखसंग्रह अशा संज्ञा रूढ होत चालल्या आहेत. स्वत:ला निबंधकार म्हणवून घेण्यापेक्षा, समीक्षक, विचारवंत किंवा विचारवंत लेखक म्हणवून घेणे अधिक पसंत करण्यात येत आहे. तथापि, संज्ञेचा आग्रह सोडला तर, निबंधाची जी बुद्धीवादी, सप्रमाण, तर्कसंगत विवेचन करण्याची प्रकृती आहे, ती लेख किंवा लेखसंग्रह यांत टिकून असल्याचे दिसून येईल.

समाजाला वैचारिक पातळीवर नाना विषयांची सप्रमाण माहिती आणि दृष्टी पुरवणारा निबंध हा प्रकार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. शालेय जीवनात निबंधलेखन आणि वक्तृत्वाचा सराव झाल्यास त्यानंतरच्या स्पर्धात्मक जीवनव्यवसायांतही त्याचा उपयोग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन नामवंत वक्तृत्व स्पर्धां मधील आणि निबंध स्पर्धां मधील उत्कृष्ट ठरलेल्या डॉ. कुमार पाटील द्वारा लिखित विद्यार्थ्यांच्या निबंधांचा उत्कृष्ट संग्रह प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी कविता सागर प्रकाशना मार्फत प्रकाशित केला आहे. निबंध संग्रह दोन भागांत असून निबंध संग्रहाचा पहिला  भाग 'संवाद' या नावाने वाचकांच्या हातात पोहचला असून त्यामध्ये विविध विषयावर १९ निबंध आहेत, संवाद पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, निबंध संग्रहाचा दुसरा भाग 'सुसंवाद' या नावाने लवकरच बच्चे कंपनीच्या सेवेत येत आहे.

विविध स्तरांवर आयोजित होणा-या वक्तृत्व व निबंध स्पर्धां मध्ये विषयांचेही वैविध्य असते. हे निबंध व भाषणे प्रत्यक्ष तेथे जाणा-यानाचं अनुभवता येतात. डॉ. कुमार पाटील यांच्या संवादने ती निबंध व भाषणे सर्वांसाठी उपलब्ध करून आणखी एक उद्देश साध्य केला आहे. संवाद हे त्याच्या साहित्यिक दर्जामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य वाचकांसाठीही संग्रहणीय असे ठरले आहे.                                                                                  - अनिल धुदाट (पाटील)
पुस्तक
संवाद
लेखक
डॉ. कुमार पाटील
आवृत्ती
प्रथम
ISBN
978-81-926535-2-5
प्रकाशक
डॉ. सुनील पाटील
प्रकाशन
कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर
पृष्ठे
68 (कव्हर सह)
आकार
1/8
मुल्य
60/-
विषय
निबंध संग्रह
वर्गवारी
शैक्षणिक
संपर्क
02322 - 225500, 9975873569


Treasure of Opposite Words
विरुद्धार्थी शब्दांचा खजिना

भाषेमुळे आपल्या मनातले विचार, भाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय  जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्‍या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या  मातृभाषेचा अभिमान  असतो. परंतु  मातृभाषा सोडून आणखी एक दोन भाषा जर येत असतील तर  त्याचा देखील आपल्याला  फायदा होतो, हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात ''Knowledge is not burden'' ज्ञान हे ओझं  नाही.

इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढतच जात आहे. संपर्क-माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते.

एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला शब्दसाठा वाढविल्याशिवाय ती भाषा आपण शिकूच  शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याची  सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही. पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल. प्रत्येक शब्दाचे होणारे अचूक उच्चार त्याचे होणारे सर्वं मराठी अर्थ देण्यात आले आहेत. पुस्तकाची मांडणी अत्यंत सोपी सुबक केली आहे. त्यामुळे शब्द शोधण्यासाठी अडचण येत नाही.

या पुस्तकात सरावासाठी स्वाध्यायाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इंग्रजी भाषेचे तीस अदभूत सत्य विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालतील यात तिळमात्र शंका नाही.  विद्यार्थी , पालक व इंग्रजी भाषा  शिकणार्‍या सर्वांसाठी हे पुस्तक महत्वाची भुमिका पार पाडेल असा आम्हाला विश्वास वाटतो .                                                               

पुस्तक
विरुद्धार्थी शब्दांचा खजिना
लेखक
सौ. रोझमेरी राज धुदाट
प्रकाशक
डॉ. सुनील पाटील
प्रकाशन
कविता सागर प्रकाशन
पृष्ठे
100 (कव्हर सह)
आकार
1/8
मुल्य
100/-
विषय
इंग्रजी शब्दकोश
वर्गवारी
शैक्षणिक
संपर्क
02322 225500, 9975873569 sunildadapatil@gmail.com

o       राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अर्श - मैत्री ग्रंथालयाकरिता शिफारस केलेले पुस्तक...
o       किशोरवयीन मुलींचे भावविश्व हळुवारपणे रेखाटन केलेले पुस्तक -
एक कळी उमलतांना
(किशोरवयीन मुलींच्या कथा)
संपादक - बाबुराव शिरसाट
प्रतिक प्रकाशन, प्लॉट # २३, सुश्रुषानगर,
देवकर पाणंद, कोल्हापूर, जिल्हा - कोल्हापूर
दूरध्वनी - ९७३०४०८५९०
मुल्य - ९० रुपये + (टपाल खर्च रुपये १०  = एकुण १००/-)           पृष्ठ संख्या - ८४

  विधिलिखित  
H¥$îUm nmQ>rb ho O¶qgJnwamVë¶m H$mhr hOma gd© gm‘mݶ ‘ܶ‘ dJm©Vë¶m bmoH$m§‘Ybo EH$ "gmYo gwYo' ì¶{º$‘Ëd. ‘r gmYo gwYo hm eãX ‘wÔm‘ AYmoao{IV Ho$bm Amho. ˶mMr XmoZ H$maUo AmhoV. EH$ åhUOo gmYo AgUo ho Iyn AdKS> Amho. ‘‘To be simple is very difficult’’. OÝ‘mZ§Va H$mhr df} gJioM gmYo, gmono, Am{U gai AgVmV. nU Z§Va Hw$R>oVar gmYonUmMr OmJm, MbmIr, gmononUmMr OmJm, g’$mB©XmanUm Am{U gainUmMr OmJm diU§ ¿¶m¶bm bmJVmV.

gÎmar Amobm§S>boë¶m H¥$îUm nmQ>rb ¶m§Zr Amnb§ gmYonU ‘ZmnmgyZ Onb§ Amho. Xþgao H$maU åhUOo ¶m gmYonUm‘mJo {XbXma, H$b§Xa Am{U hahþÞar ‘mUyg XS>bm Amho. Mm§JwbnUm, CXmÎmVm, göX¶Vm, YmS>g, àg§JmdYmZ Am{U Vab ~w{Õ‘Îmm ho JwU ˶m§À¶mV CnOVM hmoVo. ˶m JwUm§Mr ˶m§Zr Am¶wî¶^a OmonmgZm Ho$br. åhUyZ H¥$îUm nmQ>rb ¶m§Zm ‘r gmYm gwYm åhQ>b§.

H¥$îUm nmQ>rb Oo OJbo, Ogo OJbo ˶mVbo H$mhr àg§J ˶m§Zr Ogo KS>bo Vgo ¶m nwñVH$mV eãX~Õ Ho$bobo AmhoV. VWmH${WV à{V^md§V boIH$m§Zr AmoTy>Z VmUyZ {b{hboë¶m H¥${Ì‘ H$Wm§À¶m nmoe©^y‘rda H¥$îUm nmQ>bm§À¶m ¶m am§JS>çm ^mfoV {b{hboë¶m Iè¶m Iwè¶m, AH¥${Ì‘ H$Wm Oem ‘m¶m ‘Zmbm ^mdë¶m Vem Aݶ dmMH$m§Zmhr Z¸$sM ^mdVrb Ago ‘bm dmQ>Vo. ˶m§À¶m ^mfm e¡brbm ‘r "am§JS>m' hm eãX dmnabm Agbm Var CJmMM OmUyZ~wOyZ J«m‘rU EodOr J«må¶ Am{U An^«§e ‘amR>r ˶m§Zr dmnabr Zmhr. hr ‘m¶mgmR>r Iyn g‘mYmZmMr Jmoï> Amho.
˶m§À¶m H$Wm§‘YyZ ‘Zwî¶ OrdZmÀ¶m AZoH$ n¡by§Mo CÎm‘ Xe©Z KS>Vo. ¶m H$Wm‘ܶo Ogm Omoe Amho, Ver H$ê$Um Amho. Ogo YmS>g Amho, Ver göX¶Vm Amho. Oer H$V©ì¶ H$R>moaVm Amho, Ver g§doXZerbVm Amho. Am{U Oer ‘mUwgH$s d ‘XV H$aʶmMr d¥Îmr Amho, VgoM H$R>rU àg§Jr AZmoiIr bmoH$m§Mo ghH$m¶© {‘idʶmMo H$g~nU Amho.

˶m§À¶m gJù¶mM H$Wm dmMH$mbm Jw§VdyZ R>odUmè¶m AmhoV. "O„mof' Am{U "~m§JS>çm' ¶m H$Wm‘YyZ ˶m§À¶m ~mbnUrMm hþS>nUm, YmS>g Am{U AmìhmZm§Zm AmË‘{dídmgmZo gm‘moao OmʶmÀ¶m d¥ÎmrMo gw§Xa {MÌU Pmbo Amho.

सर्व साधारण जीवनातल्या बाबी - गप्पागोष्टी - सुखदुख: आपल्या माणसाला सहजगत्या बोलता - बोलता सांगावीत अशी कथन केली आहेत. सहज साधी सरळ सोपी बोलीभाषात लिखाण असलेमुळे मनाला भावते. सर्वच कथा मध्ये कृष्णा पाटील निवेदक / सूत्रधाराची भूमिका बजावत त्या कथन करतात त्यात ते स्वत: समावेशित आहेत.

"AmB©' gma»¶m H$Wo‘YyZ {dñH${iV Hw$Qw>§~ ì¶dñWoMm d g‘mO OrdZmMm {dXmaH$ Moham ˶m§Zr g‘moa AmUbm Amho, Jmodm Vo O¶qgJnya hm ˶m§Mm ñHy$Q>adaMm àdmg Va AmnU ñdV:M H$arV AmhmoV AgoM dmMH$mbm dmQ>ob. "bim' Am{U "YaUr‘mVm' ¶m gma»¶m H$Wm Jar~rMo Am{U ˶mVyZhr ñdm{^‘mZ d g§doXZerbVoZo OJUmè¶m OJmMo g‘W©nUo Xe©Z KS>dVmV.

H¥$îUm nmQ>rb ¶m§Mr ^mfm, eãX à¶moJ d e¡br ~mb~moY Am{U amoIR>moH$ Amho. ˶mbm {gÕhñV boIUrMm ~mO Ambm Zmhr ho EH$m Ñï>rZo ~ao Pmbo Ago ‘bm dmQ>Vo. ˶mV H$mhr ì¶mH$aUmÀ¶m MwH$m AgVrb, H$mhr {R>H$mUr H$Wm AMmZH$ gwê$ Pmë¶mgma»¶m dmQ>VmV, H$mhr {R>H$mUr ^mdZm Am{U ñd^md ¶m§Mo {MÌU AmUIr {dñVmamZo ìhmdo Ago dmQ>Vo. Va H$mhr H$Wm Iyn AMmZH$ Am{U bdH$a g§në¶m Aer hþahþa ‘Zmbm bmJVo. nU øm H$mhr H$‘VaVm boIH$mMo ì¶{º$‘Ëd Am{U H$Wm~rOmMr VmH$X OmñV àH$fm©Zo g‘moa AmUʶmV ¶eñdr R>abo AmhoV.

H¥$îUm nmQ>rb ¶m§À¶m H$b§Xa Am¶wî¶mbm "{bIV§' H$aʶmMo H$m‘ S>m°. gw{Zb nmQ>rb ¶m§Zr Ho$bo Amho. Hw$R>ë¶mhr ‘mUgmVrb gwá à{V^m emoYʶmMo H$m¡eë¶ gw{ZbH$S>o Amho. d ˶m à{V^obm "{bIV§' H$aʶmgmR>r nmR>nwamdm H$aʶmMo H$g~hr ˶mÀ¶mH$S>o Amho. gwZrbZo hm H$Wm g§J«h àH$m{eV H$ê$Z EH$ PmH$bm, gmYm ‘mUyg g‘moa AmUë¶m~Ôb ‘r ˶mMo A{^Z§XZ H$aVmo. Am{U H¥$îUm nmQ>rb ¶m§Zr ¶mZ§Vahr Amnbr AZw^dmMr {eXmoar eãXmV ‘m§S>mdr Aer Anojm H$aVmo.

- ‘oOa àH$me nmQ>rb

o       पुस्तकाचे नाव: विधिलिखित

o       प्रस्तावना:  मेजर प्रकाश पाटील ({ejU Vk, {MÌnQ> {Z‘m©Vo d gm{hp˶H$)

o       लेखक: कृष्णा ज्ञानू पाटील

o       प्रकाशक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील

o       प्रकाशन: शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर

o       पृष्ठे: 76

o       मुल्य: 50

o       संपर्क: 9890559700, 9975873569, sunildadapatil@gmail.com

जागर
विजयकुमार दत्तू पोवार हे ग्रामीण परिसरात राहून काव्य लेखन करणारे मनस्वी वृत्तीचे कवी आहेत, त्यांच्या 'जागर' या पहिल्या काव्यसंग्रहात विविध विषयावरील 50 कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. 'जागर' या पहिल्याच कवितेत ज्ञान आणि कर्तृत्व शक्तीचे महत्व त्यांनी विशद करून सांगितले आहे, 'प्रार्थना' या कवितेतून 'सकल जीवांचे संकट हरावे, सर्वांचे कल्याण करावे' अशी ते ईश्वराची करुणा भाकतात आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या 'पसायदाना' ची आठवण करून देतात. जीवनातील यशाची गुरुकिल्ली ते सत्वशील साधनेतून शोधतात. 'गान कोकिळा' या कवितेत त्यांनी लता मंगेशकरांच्या गायन कलेची थोरवी गायिलेली आहे. पिंज-यात बंदिस्त असलेल्या पक्षांपासून पोटासाठी शरीर विक्रय करणा-या वेश्येपर्यंत अनेक जीवांच्या व्यथा त्यांनी आपल्या काव्यातून मांडलेल्या आहेत. 'स्फूर्ती' या कवितेतून त्यांनी क्रांतिवीरांच्या शौर्याची गाथा गायिलेली आहे. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार असल्याचा मंत्र वाचकांना त्यांनी 'तूच तुझा रे गुरु' या कवितेतून दिलेला आहे. 'आई' या कवितेत मातेची महती 'त्रिभुवनी पाहू जाता अन्य दैवत ते नाही' अशा शब्दातून गायिलेली आहे. लोकशाहीचे धिंडवडे काढणा-या स्वार्थी राजकारण्यांवर शब्दांचे त्यांनी कोरडे ओढलेले आहेत. बापाची थोरवी त्यांनी 'बाप म्हणजे काय? डोईवरचं आभाळचं हाय' अशा समर्पक शब्दात सांगितली आहे. ऊस तोड करणा-या कुणब्यांच्या कष्टांचे आणि संकटांशी झुंजण्यास सिद्ध असणा-या हिमतीचे त्यांनी 'ऊसतोड कुणबी' या कवितेत कौतुक केलेले आहे. काही कवितांमधून सुंदर निसर्गाचे वर्णनही आलेले आहे. एकंदरीत सर्वस्पर्शी विषय, समर्पक आशय आणि साध्या सोप्या भाषेतील अभिव्यक्तीमुळे श्री. पोवारांचा 'जागर' हा काव्यसंग्रह रसिक मनाचा वेध घेणारा निश्चितच आहे.                                                                                                    - श्याम कुरळे, कोल्हापूर

o       मुल्य ६० रुपये                           कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर

No comments:

Post a Comment